*खंडाळा येथील अपहृत व्यक्तीची माळेगाव पोलिसां कडून सुटका ४ आरोपींस अटक*
बारामती:- काल रोजी नियंत्रण कक्षामार्फत माहिती प्राप्त झाली होती की, खंडाळा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 138/2021 मधील आरोपी हे अपहृत व्यक्तीसह xuv गाडी नं.MH 14 DN 0126 या गाडीसह मौजे माळेगाव बु. ता.बारामती जि. पुणे च्या दिशेने येत आहेत. ची माहिती मिळताच माळेगाव पोलिस चौकीचे अंमलदार पो ना चांदणे, पो शी प्रशांत राऊत, दीपक दराडे यांना नाकाबंदी करून सदर आरोपींचा शोध घेणे बाबत सूचना दिल्या. आरोपींचा शोध घेणे सुरू असतानाच खंडाळा पोलीस स्टेशन चा स्टाफ तेथे आल्याने त्यांच्याकडून आरोपी बाबत सखोल माहिती प्राप्त केली असता आरोपी हे माळेगाव येथील राहणार असल्याचे समजल्याने ४ आरोपीस अपहृत व्यक्तीसह मालेगाव तालुका बारामती जिल्हा पुणे येथून अटक करू अपहृत व्यक्तीची सुटका करण्यात आली आहे. आरोपी व अपहृत व्यक्तीस खंडाळा पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक पांगारे यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरची कामगीरी बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री ढवान सो, स पो नि श्री राहुल घुगे यांचे मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलिस चौकीचे अंमलदार पो ना चांदणे, पो शी प्रशांत राऊत, दीपक दराडे यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment