बारामती:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बारामतीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मा.श्री.नंदकिशोर पाटील साहेब यांची भेट घेऊन बारामती शहर व तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरु असलेल्या ओवरलोडींग(Overloading) गाड्यांवर योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी ,त्याचबरोबर वीट ,वाळू ,मुरुम ,खडी अशा स्वरूपाच्या बांधकामाचे साहित्य घेऊन वाहतूक करणाऱ्या गाड्या या क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करून परिवहन कायद्यांचा भंग करत असल्याबाबत ची गोष्ट माननीय पाटील साहेबांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.बहुसंख्य मालवाहतूक गाड्यांच्या नंबर प्लेट देखील पुसलेल्या असतात .बारामती एमआयडीसी मधील बहुसंख्य कंपन्यांमधून बाहेर येणाऱ्या गाड्या व आत जाणाऱ्या गाड्या यांच्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल भरलेला असतो .सदर विषयावरती माननीय श्री पाटील साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन दिला .व याबाबत लवकरच वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार करून फ्लाईंग स्कॉड सुरू करण्याबाबतची मागणी पूर्ण करण्यात येईल अशा प्रकारचे आश्वासन दिले .यावेळी मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष ॲड.पोपटराव सूर्यवंशी ,बारामती तालुका अध्यक्ष ॲड.निलेश वाबळे ,संघटक ऋषिकेश भोसले ,शक्ती मोरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Post Top Ad
Monday, October 25, 2021
Home
ताज्या घडामोडी
बारामती
ओवरलोडींग(Overloading)गाड्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मनसे तर्फे मागणी...
ओवरलोडींग(Overloading)गाड्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मनसे तर्फे मागणी...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment