सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या यशस्वी पाठपुराव्यानंतर सर्व S.T बस सेवा पुन्हा सुरू - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, October 14, 2021

सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या यशस्वी पाठपुराव्यानंतर सर्व S.T बस सेवा पुन्हा सुरू

सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या यशस्वी पाठपुराव्यानंतर सर्व S.T बस सेवा पुन्हा सुरू

बारामती:- विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाने पुढाकार घेतला आणि संघटनेच्या वतीने निवेदन दिल्या नंतर दिड वर्षापासून बंद असलेल्या बारामती तालुक्यातील सर्व S.T बस सेवा अवघ्या दोन दिवसांत पुन्हा सुरू करण्यात आल्या. 

      कोरोना च्या काळात प्रथम लॉकडाऊन पडल्यापासून ते आजपर्यंत बऱ्याच गावांतील बंद केलेली S.T बस सेवा अजुन पर्यंत बारामती आगराकडून सुरू करण्यात आलेली नव्हती. परंतु सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने निवेदन देण्यात आल्या नंतर अवघ्या दोन दिवसांच्या आत बंद केलेल्या सर्व S.T बस सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्या. या बस सेवा जवळपास एक ते दिड वर्षापासून पूर्णतः बंद होत्या. बंद करण्यात आलेल्या सर्व बस सेवा पुन्हा सुरू कराव्यात अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने दोन दिवसांपुर्वी बारामती आगर प्रमुखांकडे करण्यात आलेली. 
                   बारामती तालुक्यातील जवळपास सर्वच शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात आलेली आहेत. S.T बस सेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांना कॉलेज ला ये-जा करण्यासाठी खाजगी वाहनांचा वापर करावा लागत होता. ते खाजगी वाहन चालक त्यांच्या मर्जी नुसार ज्यादा दर आकारात होते. ते दर विद्यार्थ्यांना परवडत नसल्याने त्यांना इतर पर्यायांचा वापर करावा लागत होता. प्रसंगी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत होते.    विद्यार्थ्यांची ही अडचण सोडवण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलन च्या वतीने S.T बस सेवा सुरू करण्याची मागणी सुरवातीपासूनच लावून धरलेली होती. S.T बस सेवा तात्काळ सुरू न केल्यास प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना घेवून बारामती आगरा समोर तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असा इशारा देखील सम्यक च्या वतीने देण्यात आलेला होता.
                  आजपासून सुरू करण्यात आलेल्या S.T बस मध्ये घाडगेवाडी शटल, देवळे पार्क, ढेंगळे गार्डन, बऱ्हाणपूर रेल्वेगेट, MIDC, लोणीभापकर शटल, शिवपुरी, लाटे, रावणगाव या गाड्या सुरू करण्यात आल्या. तसेच यातील काही ठिकाणच्या गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या. या गाड्या सुरू करण्यासाठी बारामती आगर S.T कामगार संघटनेचे अध्यक्ष विकास भोसले यांनी अधिक प्रयत्न केले. अशी माहिती सम्यक विद्यार्थी आंदोलन बारामती तालुका अध्यक्ष रोहित भोसले यांनी दिली.

No comments:

Post a Comment