पोलीस दलात खळबळ..10 लाखाची लाच मागणारे दोन पोलीस उपनिरीक्षक अॅटी करप्शनच्या जाळ्यात... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, November 29, 2021

पोलीस दलात खळबळ..10 लाखाची लाच मागणारे दोन पोलीस उपनिरीक्षक अॅटी करप्शनच्या जाळ्यात...

पोलीस दलात खळबळ..10 लाखाची लाच मागणारे दोन पोलीस उपनिरीक्षक अॅटी करप्शनच्या जाळ्यात...                                ठाणे :-फसवणुकीच्या प्रकरणात अटक न करण्यासाठी 10 लाखांची मागणी करुन अडीच लाखांवर तडजोड करुन 50 हजारांची लाच स्विकारणाच्या  दोनउपनिरीक्षकांना पोलीस ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (दि.29) रात्री रंगेहात पकडले. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस ठाण्यात ही कारवाई केली असून पोलीस उपनिरीक्षक गोविंद एकीलवाले आणि प्रकाश कांबळे यांना लाच घेताना रंगेहात पकडले. त्यांच्यावर मीरा रोड पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे ठाणे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. माहितीनुसार,यातील तक्रारदाराविरुद्ध शाहाबुद्दीन पठाण यांनी फसवणुक केल्याचा तक्रार अर्ज केला होता. या अर्जाची चौकशी मीरा रोड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक गोविंद एकीलवाले (वय-32 रा. मीरा रोड, ठाणे) हे करीत होते.अनुषंगाने यांच्याविरुद्ध गुन्हा  दाखल करुन अटक करु नये यासाठी गोविंद यांनी तक्रारदार यांच्याकडे तब्बल 10 लाख रुपये मिळालेल्या एका त्याच अर्जाच्या तक्रारदार लाच मागितली. त्यासाठी पोलीस उपनिरीक्षक
प्रकाश कांबळे यांनी त्यांना प्रोत्साहित केल्याची
तक्रार 2 नोव्हेंबर रोजी ठाणे लाचलुचपत
प्रतिबंधक विभागाला प्राप्त झाली.या तक्रारीच्या अनुषंगाने 3 नोव्हेंबर रोजी पडताळणी केली. तेव्हा एकीलवाले यांनी तक्रारदाराकडे रक्कम न सांगता लाचेची मागणी केली. त्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी पुन्हा पडताळणी केली. त्यावेळी तक्रारदाराकडे पुन्हा अडीच लाखांची मागणी केली. यावेळी उपनिरीक्षक कांबळे यांनीही ही लाचेची रक्कम देण्यासाठी प्रोत्साहित करुन 29 नोव्हेंबर रोजी स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.त्यानुसार आज (सोमवार) मीरा रोड पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले मार्गदर्शनाखाली ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. त्यावेळी एकीलवाले यांनी तक्रारदार यांच्या खासगी वाहनाने पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर नेले.त्याठिकाणी तक्रारदार यांच्याकडून 50 हजार रुपयांची रक्कम स्विकारली. ती त्यांचा हस्तक मुकेश कोरटीयन उर्फ अण्णा यांच्याकडे देऊन ते दोघेही पसार झाले. फरार झालेल्या एकीलवाले यांना ठाण्यातील कोर्टनाका येथील पॅव्हिलियन हॉटेलमधून तर कांबळे यांना त्यांच्या मीरा रोड येथील राहत्या घरातून अटक केली. तर त्यांचा तिसरा खासगी साथिदार मुकेश उर्फ अण्णा फरार आहे.

No comments:

Post a Comment