प्रभाग रचना व आरक्षण सोडत डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात..आचारसंहिता 15 जानेवारीला?
पुणे :निवडणूक कधी जाहीर होईल केव्हा आरक्षण पडेल याचीच चर्चा चालू असताना मिळालेल्या माहितीनुसार महापालिका निवडणूक २०२२ साठीची रचना व आरक्षण सोडत डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होउन १५ जानेवारीपर्यंत निवडणुकीची घोषणा होईल. तर निवडणूका फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अथवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतील, अशी माहिती वरिष्ठ अधिकार्यांनी दिली.पुणे, पिंपरी चिंचवडसह राज्यातील १० महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या राज्य निवडणूक आयोगाने ३० नोव्हेंबरपर्यंत प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश या महापालिकांना दिले आहेत. त्यादृष्टीने महापालिकेने कच्चा आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. निवडणूक आयोगाकडून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हरकती व सूचनांसाठी प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर करणे तसेच आरक्षण सोडत काढण्यासाठी आदेश मिळण्याची शक्यता आहे. हरकती व सूचनांवर सुनावणी झाल्यानंतर जानेवारीच्या मध्यावर निवडणूक कार्यक्रम घोषित होईल. मतदान साधारण फेब्रुवारीच्या शेवटच्या अथवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकार्यांनी दिली. मार्चच्या पहिल्या आठवड्यात मतदान दहावी व बारावीच्या वार्षिक परीक्षांमुळे पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी माहिती मिळतेय.
No comments:
Post a Comment