लॉकडाउन पासून बंद असलेली बारामती पुणे रेल्वे सेवा लवकर सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन - मध्य रेल्वे प्रशासनाला मनसेचा इशारा - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, November 10, 2021

लॉकडाउन पासून बंद असलेली बारामती पुणे रेल्वे सेवा लवकर सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन - मध्य रेल्वे प्रशासनाला मनसेचा इशारा

लॉकडाउन पासून बंद असलेली बारामती पुणे रेल्वे सेवा लवकर सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन - मध्य रेल्वे प्रशासनाला मनसेचा इशारा 

बारामती:- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व महाराष्ट्रासहित देशभरात वेळोवेळी पुकारण्यात आलेला लॉकडाउन यामुळे गेल्या वर्ष भरापासून बंद करण्यात आलेली पुणे- बारामती ही नियमित असणारी रेल्वे सेवा ही तात्काळ सुरू करण्यात यावी व प्रवाशांना दिलासा द्यावा या मागणीसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक व बारामतीचे स्टेशन अधीक्षक यांना पत्र देण्यात आले .महाराष्ट्र सरकारने देखील कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या लोकांना रेल्वे प्रवासाची मुभा दिलेली असतानाही मध्य रेल्वे प्रशासन अद्यापही पुणे - बारामती रेल्वे सेवा सुरू करत नसल्यामुळे दररोज पुणे बारामती प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत . सध्या संपूर्ण महाराष्ट्रात विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कामगारांचा संप सुरू असल्यामुळे सर्व प्रवासी वाहतूक ठप्प पडली आहे . अशातच शासनाने घालून दिलेले रेल्वे प्रवासासाठीचे सर्व नियम घालून रेल्वे प्रशासनाने ही रेल्वे सेवा तात्काळ सुरू केली पाहिजे अशी नियमितपणे पुणे - बारामती प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची मागणी आहे . 
जर या मागणीचा गांभीर्यपूर्वक विचार न करता रेल्वे प्रशासनाने जर ताठर भूमिका घेतली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या कार्यालयात 'आगळेवेगळे' आंदोलन करेल असा इशारा या पत्राद्वारे देण्यात आला . यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बारामती तालुकाअध्यक्ष ॲड.नीलेश वाबळे ,जिल्हा उपाध्यक्ष ॲड.पोपटराव सूर्यवंशी , शहर उपाध्यक्ष स्वप्नील मोरे, ॲड.भार्गव पाटसकर ,गोकुळ केदारी ,प्रीतम तपकिरे व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते .

No comments:

Post a Comment