देसाई इस्टेट मध्ये श्रमदान व फ्लॉगेथॉन अभियांचा शुभारंभ..
बारामती:- शहरातील प्लॅस्टिक कचरा चे समूळ उच्याटन करण्यासाठी व नागरिकामध्ये जनजागृती करण्याच्या साठी बारामती नगरपरिषद च्या वतीने श्रमदान फ्लॉगेथॉन अभियांनाचा शुभारंभ देसाई इस्टेट मध्ये करण्यात आला या वेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे,गटनेते सचिन सातव,नगरसेवक अतुल बालगुडे ,मुख्यधिकारी महेश रोकडे व छगन आटोळे,संग्राम खंडागळे, हेमंत भाऊ नवसारे,युवराज गजाकस,अमोल पवार,राहुल वायसे,महेश कोडलिंगे,आकाश काटे,निलेश पवार,ऍड खोमणे,सुरेश पवार,कल्याण पाटील आदी मान्यवर उपस्तीत होते
नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करावा व कचरा गाडीत टाकावा,पॉलिथिन पिशव्यांचा वापर करू नये तरच योग्य प्रकारे कचऱ्याची विल्हेवाट लावली जाऊ शकणार असल्याची माहिती नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी दिली.
पर्यावरण संतुलन व नागरिकांचे आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी कचरा विल्हेवाट लावणे महत्वाचे आहे म्हणून नगरपरिषद च्या अभियानास सहकार्य करावे व नागरिकांनी स्वतः पुढे यावे असे आव्हान गटनेते सचिन सातव यांनी केले या वेळी उपमुख्यधिकारी पदमश्री
धाईगिजे,आरोग्य अधिकारी राजेंद्र सोनवणे,बांधकाम अभियंता रत्नरंजन गायकवाड,रमेश मोरे,स्नेहल गायकवाड,संतोष तोडकर,सुनील धुमाळ,कोमल सावरे,आरोग्य पर्यवेक्षक निखिल शीलवंत आदी नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी व सफाई कर्मचारी , ,श्री गणेश तरुण मंडळ,राजे छत्रपती प्रतिष्ठान व निर्मिती रॉयल चे पदाधिकारी व नागरिक सहभागी झाले होते.
प्रास्ताविक नगरसेवक अतुल बालगुडे यांनी केले. तर आभार हेमंत नवसारे यांनी मानले.
लाखो व कोटी रुपयांचे अनेक भूखंड शहरात आहे, मोकळ्या भूखंड च्या मालकांनी साफसफाई न केल्यास त्यांच्यावर सार्वजनिक आरोग्यास अडथळा निर्माण केला म्हणून दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे नगरपरिषद च्या वतीने सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment