बारामती शहर पोलिसांची अवैद्य गुटखा विक्रेत्यांवर ५० हजार ६७४ रुपये किंमतीचा
गुटखा जप्त करून कारवाई.. बारामती:- शहरांमध्ये अवैद्य रित्या गुटखा विक्री केल्याप्रकरणी केशव सोनबा जाधव (वय ५५ वर्ष) व संजय केशव जाधव दोन्ही (रा: नेवसे रोड कैकाड गल्ली बारामती ता .बारामती जि पुणे) या दोघांविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून केशव सोनबा जाधव याला ताब्यात घेतले असून संजय केशव जाधव हा पोलीसांची चाहूल लागताच पळून गेला आहे.मिळालेल्या माहितीनुसार (दि.१८) रोजी बारामती शहरातील नेवसे रोड येथील कैकाड गल्ली या ठिकाणी केशव सोनबा जाधव व संजय केशव जाधव या दोघांनी संगणमत करुन महाराष्ट्र राज्यात गुटखा
बंदीचा आदेश असताना देखील पान मसाला गुटखा विक्री करण्याचे उद्देशाने आपल्या घराच्या पाठीमागे असलेल्या स्वताचे मालकीच्या पत्र्याचे शेडमध्ये बेकायदा विक्री करत असल्याची माहिती मिळाली.दरम्यान पोलीसांनी सदर ठिकाणी धाड टाकली त्या ठिकाणी एकूण ५० हजार ६७४ रुपये किंमतीचा पान मसाला गुटख्याचा साठा करुन ठेवल्याचे निदर्शनास आले. व त्या ठिकाणी सदर व्यक्ती केशव सोनबा जाधव हा मिळून आला व संजय केशव जाधव हा पोलीसांची चाहूल लागताच पळून गेला आहे. वगैरे मजकुराचे फिर्यादीवरुन गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई पाटील हे करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या
मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील, युवराज घोडके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय जगदाळे, पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे, अभिजीत कांबळे, पोलीस नाईक दशरथ कोळेकर पोलीस नाईक कल्याण खांडेकर, पोलीस शिपाई तुषार चव्हाण, पोलीस शिपाई कोठे, पोलीस शिपाई सचिन कोकणे, दशरथ इंगोले, मनोज पवार यांनी केली.
No comments:
Post a Comment