बारामती शहर पोलीस स्टेशन ची धडाकेबाज कामगिरी, वेश्या व्यवसाय करणाऱ्यावर कारवाई.. बारामती(संतोष जाधव):-बारामती येथे काय उणे अशी म्हण झाली होती कारण याठिकाणी अवैध धंदे जोरात चालू होते हे काही दिवसांपासून झालेल्या कारवाई वरून दिसून येत आहे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अखेर दखल घेऊन भर सभेत सांगावे लागले की कधी बेकायदेशीर धंदे बंद होणार, याच अनुषंगाने कारवाईला सुरुवात झाली दारू, जुगार, गुटखा पाटोपाट बारामती शहरातील गणेश मार्केट भाजी मंडई परिसरात सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर शहर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत कसब्यातील लेंडीपट्टा येथे
राहणार्या महिलेला ताब्यात घेत अटक करण्यात आली.तिच्याविरोधात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करत दोन पीडित महिलांची सुटका केली. शहरातील गणेश मार्केट भाजी मंडई, गुणवडी चौक परिसरात या महिला वेश्या व्यवसाय करत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि. १९) रात्री दहाच्या सुमारास पोलिसांकडून या ठिकाणी कारवाई केली.महाडिक यांच्यासह सहाय्यक फौजदार संजय जगदाळे,दशरथ कोळेकर, बंडू कोठे, पोलिस नाईक संध्या कांबळे यांनी या कारवाईत भाग घेतला.गणेश मार्केट जवळील एका सराफाच्या दुकानासमोर थांबून तीन महिला वेश्या व्यवसाय करत होत्या.महाडिक यांच्याकडे परिसरातील नागरिकांनी या प्रकरणी तक्रार केली होती. त्यानुसार त्यांनी तिघे पंच तयार करत सदर ठिकाणी छापा टाकला.सुरवातीला पोलीसांनी बनावट ग्राहक तयार करून,त्याच्याकरवी त्या ठिकाणी उभ्या असलेल्या महिलेकडे
पाठवले. त्यानंतर तिला पैसे दिल्यानंतर साध्या वेशातील पोलिसांना इशारा केला. आणि पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकत महिलेला ताब्यात घेतले. सदर महिला मूळची एरंडोल (जि. जळगाव) येथील असून,कसब्यातील एजंट महिला माझ्याकडून हे काम करून घेत असल्याचे पोलीसांना सांगितले.त्यानंतर पोलिसांनी एजंट महिलेला ताब्यात घेतले.तिच्यासोबत बारामतीतील आणखी एक महिला आढळून आली. तिनेही एजंट महिला कमिशनपोटी हा व्यवसाय करून घेत असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सदर दोन पिडीत महिलांची सुटका करत, एजंट महिलेला अटक केली. त्यांच्याकडून मोबाईल व रोख रक्कम जप्त करण्यात आली.या परिसरात वेश्या व्यवसाय नित्याची बाब झाली आहे.त्याचा त्रास स्थानिक व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतो. मंडई परिसरात महिला ग्राहकाच्या
शोधात फिरत असतात. अनेकदा त्यांच्याकडून काहींची लूटही करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत.पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी येथे कारवाई केल्याने व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले असून बारामती व परिसरातील लॉज वर देखील कारवाई करून खात्री करावी अशी मागणी होत आहे
No comments:
Post a Comment