रेशनचे धान्य विकल्यास सावधान..धान्य कायमचे होऊ शकते बंद.!धान्याचा काळाबाजार थांबणार का?
बारामती(संतोष जाधव):- गरजू आणि गौरगरिबांना उपाशी राहावे लागू नये, यासाठी आपल्याकडे स्वस्त दरात धान्य वितरित केले जाते.सरकारकडून अल्पदरात मिळणाच्या
धान्याची लाभार्थींच अन्यत्र विक्री करीत असल्याचे समोर आले आहे. अशा ग्राहकांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे, धान्य कायमचे बंद करण्याचे अधिकारही संबंधितांना दिल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकार्याने दिली.अंत्योदय योजनैतर्गत प्रतिव्यक्ती तीन किलो गहू दोन रुपये आणि दोन किलो तांदूळ तीन रुपये दराने वितरित केले जातात. त्याचप्रमाणे केशरी कार्डधारकांना अनुक्रमे १० आणि १२ रुपयांत है धान्य वितरित केले जाते.कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे हातावर पोट असलेल्यांचे हाल झाले. त्यांना आधार देण्याकरिता नोव्हेंबरपर्यंत मोफत
धान्य वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला असला शक्यता आहे,
* *अशी होते विक्री...**
॥ रेशनवर मोफत आणि रास्त दरातील धान्य एकत्र मिळते.प्रतिव्यक्ती १० किलो धान्य गोळा होते. घरात चार माणसे असल्यास त्यातील निम्मेही संपत नाही.त्यामुळे उर्वरित धान्य विक्री केले जाते.किराणा दुकानदार व मार्केट यार्ड मधील व्यापारी कमी किमतीत धान्य घ्यायला तयारच असतो.तांदूळ १० रुपये आणि गहू १५ रुपयापर्यंत तो खरेदी करतो.पुढे तोच माल अन्य ग्राहकांना ज्यादा दराने विकला जातो, या साखळीत दोघांचाही नफा होत असल्याने बरेच लाभार्थी या गैरप्र-काराकडे वळल्याचे दिसून येत आहेत.त्याचा गैरफायदा घेत अल्प उत्पन्न गटातील काही लाभार्थ्यांनी रेशनवर मिळणाऱ्या धान्याची गुणवत्ता चांगली नसते. त्यामुळे रेशनवर मोफत आणि रास्त दरात मिळणारे धान्य विकून लाभार्थी त्या पैशात चांगला तांदूळ विकत घेतात.त्यात अतिरिक्त पैसे घालावे लागत असले
तरी चांगले धान्य मिळत असल्याने असे करावे लागते, अशी प्रतिक्रिया एका गृहिणीने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर दिली,कोणीही व्यक्ती उपाशी झोपू नये,या उदात्त हेतुने शासन मोफत आणि रास्त दरात धान्य वितरित करीत आहे मात्र लाभाध्यांकडून असे प्रकार होत असतील तर
ते साफ चुकीचे आहे.रेशनिंगचा माल विकून नफा कमावण्याचा मार्ग अवलंबला असल्याचे दिसत आहे. **रेशनिंग दुकानदार असा विकतो धान्य** दुकानात आलेला माल खराब आहे असे भासवून लाभार्थी धान्य घेण्याचे टाळतात याचाच फायदा काही दुकानदार घेत असतात, समोरच्या दर्शनी खराब, सडलेला मालाची दोनचार पोती मांडायची हे समोरचे चित्र पाहून ग्राहक माल घेत नाही ,चांगला माल दुसरीकडे ठेवायचा असे अनेक प्रकार पहावयास मिळत आहे ,यातूनच धान्याचा काळाबाजार कसा होतो दिसून येईल अशी माहिती काही सामाजिक कार्यकर्ते यांनी बोलून दाखविली.
No comments:
Post a Comment