एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, November 9, 2021

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा

बारामती:- राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे अनेक ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाच्या कामगारविरोधी धोरणाला वैतागून स्वतःचे जीवन संपवले आहे राज्य सरकार आणि विरोधी पक्ष हे मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळत असून त्यांच्या मागण्या मान्य करायला तयार नाही पाच वर्षे सत्तेत असताना भाजप-शिवसेना या पक्षाने एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न सोडवले नाहीत आणि आता सत्तेत बसलेले शिवसेना-काँग्रेस- राष्ट्रवादी या पक्षांनीही कामगारांच्या प्रश्नांपासून पळ काढलेला आहे एसटी आगारात सुरू असलेल्या कर्मचार्‍यांच्या आंदोलनास दडपण्यासाठी कर्मचाऱ्यांना गुन्हे दाखल करण्याचा तसेच नोकरीतून निष्कासित करण्याच्या धमक्या दिल्या जात आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आदरणीय ऍड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर तसेच प्रभारी अध्यक्षा रेखा ताई ठाकूर यांच्या आदेशा प्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा बारामती याठिकानी पुणे जिल्हा, बारामती तालुका, बारामती शहराच्या वतीने देण्यात आला तरी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने दखल घेऊन त्या त्वरित पूर्ण केल्या नाहीत तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर तसेच प्रभारी अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा महासचिव मंगलदास निकाळजे यांनी दिला. त्यावेळी शहर अध्यक्ष अक्षय शेलार, ऍड रियाज खान,ता.संघटक ऍड विवेक बेडके, ऍड तुषार ओहाळ, विक्रम पंत थोरात, अक्षय चव्हाण, कृष्णा क्षीरसागर, स्वप्निल कांबळे, मयूर कांबळे, रोशन निशाद आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment