*देशद्रोही कंगना राणावत वर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी - उमेश चव्हाण*
पुणे :- १५ ऑगस्ट १९४७ साली मिळाले ते 'स्वातंत्र्य' नसून 'भीक' होती. खरे स्वातंत्र्य तर २०१४ ला मिळाले आहे. असे लबाडीचे वक्तव्य करून समस्त स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करणाऱ्या, स्वातंत्र्यचळवळीत स्वतःचे रक्त सांडवून बलिदान देणाऱ्या, मायभूमीसाठी फासावर चढणाऱ्या शूरवीर स्वातंत्र्यसैनिकांना आणि स्वातंत्र्य चळवळीला बदनाम करणाऱ्या सुमार अभिनेत्री देशद्रोही कंगना राणावतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी, अशी मागणी रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केली.
निर्लज्जपणे मूर्खपणाची मुक्ताफळे उधळण्याचे बक्षीस म्हणून अर्धनग्न अंग प्रदर्शन करणाऱ्या सुमार अभिनेत्री कंगना राणावतला 'पद्मश्री'चे बक्षीस बहाल केले खरे मात्र त्याच कंगनाने स्वातंत्र्यचळवळीत कोणतेही योगदान नसणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पूर्वजांना आता आम्ही 'स्वातंत्र्यवीर' होतो, अशा प्रकारची शेखी मिरवता येणार नाही, असेच अप्रत्यक्षरीत्या कबूल केले. असल्याचे परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले.
कंगना राणावतच्या वृत्तीप्रमाणे देशविरोधी खोटे बोलणारे आणि नथुराम गोडसेचे समर्थन करणाऱ्या लोकांचे सांस्कृतिक धाडस वाढत चालले असताना अशा पद्धतीने पवित्र स्वातंत्र्य चळवळीला बदनाम करायचे आणि दुसरीकडे देश विकायला काढणाऱ्या नालायक वृत्तीची प्रशंसा करायची. याचे बक्षीस म्हणून जर पद्मश्री मिळत असेल तर अशा पद्मश्री किताब मिळवणार्या देशद्रोही कंगना राणावतचा आम्ही तीव्र आणि जाहीर शब्दात निषेध करतो. महा विकास आघाडीने देशद्रोहाचे खटले दाखल करून तात्काळ कंगना राणावत अटक करावी. अशी मागणी देखील रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केली.
No comments:
Post a Comment