बारामती येथील लिमटेक येथे पोलिसांना धक्काबुक्की ४ जणांवर गुन्हा दाखल!
बारामती(संतोष जाधव):- बारामती येथील लिमटेक येथे शुक्रवारी रात्री दहा ते साडे दहाच्या दरम्यान लिमटेक गावच्या हद्दीमध्ये एका लग्न समारंभासाठी विनापरवाना डीजे लावून काही लोक रस्त्यावर नाचत होते. त्यावेळेस सदरची
माहिती पोलीस ठाण्यास मिळाल्याने पोलीस
हवालदार विठ्ठल मोरे, पोलीस हवालदार काळे व
पोलीस नाईक शेंडगे असे त्या ठिकाणी डीजे बंद
करण्यासाठी गेले.त्याठिकाणी काही पुरुष व महिला यांनी पोलीस डीजे बंद करत असताना पोलिसांशी हुज्जत घातली व पोलीस डीजे घेऊन जात असताना त्या ठिकाणी काही लोकांनी डीजेवर दगडफेक करून डीजे ची गाडी फोडली तसेच पोलिसांना सुद्धा धक्काबुक्की केली.त्यावेळी त्या ठिकाणावरून डीजे गाडी पळून गेली.डीजेच्या काचा काही लोकांना लागल्या. त्यावेळी पोलिसांच्या गाडीवर सुद्धा दगड मारला. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक हे घटनास्थळी गेले परिस्थिती संयमाने हाताळण्यात आली.स्थानिक लोकांच्या सहकार्याने तणाव नियंत्रित केला. या घटनेनंतर अजय सोनवणे, अक्षय शिंदे,रोहित शिंदे, महेश खिलारे, भीमा मोहन सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सदर ठिकाणी आज विवाह असल्याने कुणालाही अटक करण्यात आली नाही.
No comments:
Post a Comment