घातपात करून अटॅक चा केला बहाणा,बारामतीत असे प्रकरणे कसे दढपतात पाहाणा!..अखेर पोलिसांनी आवळल्या मुसक्या.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, November 24, 2021

घातपात करून अटॅक चा केला बहाणा,बारामतीत असे प्रकरणे कसे दढपतात पाहाणा!..अखेर पोलिसांनी आवळल्या मुसक्या..

घातपात करून अटॅक चा केला बहाणा,बारामतीत असे प्रकरणे कसे दढपतात पाहाणा!..अखेर पोलिसांनी आवळल्या मुसक्या..                                                                                                                           बारामती:-अनेक दिवसांपासून सध्या बारामती मध्ये अनेक घटनांची मालिका चालू आहे, कुणी हनी ट्रॅप अडकवीत आहे तर कुणी 13 शारीरिक शोषण करीत असल्याचे सांगतंय अश्या एक का अनेक घटना घडत असताना, नव्याने अशीच काहीशी घटना घडली याबाबत सविस्तर असे, कसबा परिसरामध्ये 11.11.21 रोजी रात्री एका महिलेचा मृत्यू हार्ट अटॅक म्हणून झालेला आहे परंतु सदर हार्ट अटॅक नसून घातपात आहे याबाबतची कुजबूज त्या परिसरामध्ये सुरू होती. सदरची कुजबूज काही दिवसानंतर पोलिसांच्या कानावर आली. सदर बाबत बारामती शहर पोलिसांनी त्यांची गोपनीय यंत्रणा कामाला लावली. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी सुद्धा सदर बाबत गोपनीय माहिती काढून वस्तुस्थिती काय आहे याबाबत आढावा घेण्यास सांगितले.
सदर ठिकाणी कुणीही उघड माहिती सांगत नव्हता सदर घटनेबाबत कुणीही उघडपणे तक्रार देत नव्हता. त्यामुळे संशयित व्यक्ती कडे चौकशी करणे जिकरीचे झाले होते. पोलिसांसमोर जो घटनाक्रम उभा राहिला होता त्या घटनाक्रम मध्ये क्रमामध्ये असणाऱ्या लोकांना पोलिसांनी चौकशी ला बोलावले त्यामधून अशी माहिती निष्पन्न की मयत महिला स्वाती विनय आगवणे वय  वय अंदाजे पन्नास वर्ष राहणार कसबा यांचे कसबा भागात मध्ये राहणारे प्रमोद उर्फ दादा नामदेव फडतरे वय 63 वर्षे राहणार कसबा बारामती यांच्या सोबत दहा वर्षापासून मैत्रीचे संबंध होते प्रमोद उर्फ दादा हे कसबा यामध्ये त्यांचा मुलगा ऋषिकेश प्रमोद फडतरे वय 34 वर्ष व मुलगी वय 33 वर्ष सुन व पत्नी यांच्यासोबत राहत होते. प्रमोद फडतरे यांचा कसबा भागामध्ये फडतरे वाडा म्हणून दुसरे जुने घर आहे त्या घरामध्ये मयत व प्रमोद उर्फ दादा नामदेव फडतरे हे अधून मधून एकमेकांना भेटायचे याची कल्पना मयत व प्रमोद दादा फडतरे यांच्या कुटुंबीयांना होती. दोन्ही कुटुंबीयांना त्यांच्या या मैत्रीचा व भेटण्याचा राग होता व ती गोष्ट त्यांना आवडत नव्हती परंतु दोघेही एकमेकांना सर्व विरोध झुगारून अधून मधून भेटत होते. प्रमोद फडतरे यांचे मुलगा ऋषिकेश प्रमोद फडतरे वय 34वर्ष व मुलगी अनुजा प्रमोद फडतरे वय 33 यांचा या गोष्टीला तीव्र विरोध होता याबाबत मयत व प्रमोद फडतरे यांच्यासोबत या दोघांनी पूर्वीसुद्धा भांडण केले होते. दिनांक 10 11 21 रोजी प्रमोद उर्फ दादा नामदेव फडतरे यांचा वाढदिवस होता वाढदिवस घरी बायका मुलांच्या मध्ये साजरा केल्यानंतर ते फडतरे वाड्यावर आले त्यानंतर त्यांनी मयत महिलेला बोलून घेतले. काही वेळानंतर  ते दोघे फडतरे वाड्यावर आहेत याबाबतची माहिती कुणीतरी मुलगा ऋषिकेश प्रमोद फडतरे व मुलगी अनुजा यांना सांगितले त्यानंतर ते दोघे त्या ठिकाणी आले व त्यांनी रागाच्या भरात मध्ये मयत व प्रमोद उर्फ दादा नामदेव फडतरे या दोघांना काठीने मारहाण केली. मारहाणी नंतर मयत महिला निपचित पडली. व प्रमोद फडतरे जखमी झाले. नंतर प्रमोद फडतरे व आरोपी ऋषिकेश व त्याची बहीण अनुजा यांनी सदर महिलेस दवाखान्यात नेण्यासाठी प्रयत्न केले परंतु रात्रीची वेळ असल्याने वाहन उपलब्ध झाले नाही  त्यानंतर सदर ऋषिकेश याने त्याचे कौटुंबिक डॉक्टर फिर्यादी सुनिल पवार यांना मोबाईल द्वारे त्यांनी मारहाण केल्याबाबत कळवले रात्रीची वेळ असल्याने डॉक्टरांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन येण्यास सांगितले. परंतु आरोपी व जखमी प्रमोद यांनी वाहन उपलब्ध न झाल्याने दवाखान्यात नेले नाही. नंतर ॲम्बुलन्स उपलब्ध झाल्यानंतर त्यांना डॉक्टर भोईटे यांच्या हॉस्पिटल ला नेण्यात आले त्याठिकाणी नेल्यानंतर कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टरांनी सदर महिला मृत झाली आहे तिचे शवविच्छेदन करण्यासाठी सिल्वर जुबली हॉस्पिटल ला नेण्यास सांगितले. सदर महिला मयत आहे हे कळल्यानंतर आरोपी दोघेही घाबरून गेले त्यांनी परत सदरचे प्रेत मूळ ठिकाणी फडतरे वाड्या वर घेऊन आले. त्यानंतर त्यांनी सदरची घटना मयताचे नातेवाईक मुलगा व मुलगी यांच्या कानावर सांगितले व त्यांना सांगितले की सदर महिला नेहमीप्रमाणे त्यांच्या वडीलांकडे आली असताना तिला हार्ट अटॅक आलेला आहे. त्या दोघांनी शंका उपस्थित केल्याने आरोपी ऋषिकेश  व मयाताचा मुलगा व मुलगी यांनी प्रेत परत डॉक्टर पवार यांच्याकडे घेऊन गेले त्याठिकाणी डॉक्टर पवार यांनी सदर चा मृत्यू चार-पाच तास अगोदर झाल्याचे सांगितले परंतु सदर मृत्यू कशाने झाला आहे हे त्यांना माहीत नसल्याचे सांगितले. त्यांना जर माहिती करून घ्यायची असेल तर त्यांनी त्या प्रेताचे शवविच्छेदन करावे. परंतु सदर प्रेतावर कुठल्याही प्रकारच्या बाह्य जखमा दिसून येत नसल्याने व केवळ नाकातून किरकोळ रक्त आल्याने व सदर महिला घसरून पडून अटॅक आल्याबाबत आरोपी यांनी सांगितल्याने व प्रमोद उर्फ दादा फडतरे यांनाही मारहाण झालेली होती परंतु आरोपी हे त्याचे मुले असल्याने त्यानेही काही वस्तुनिष्ठ माहिती त्यांना दिली नाही. त्यामुळे त्यांचाही ग्रह झाला की सदर चा मृत्यू हा अटॅकने झाला असेल त्यांना घातपाताची काही शंका आली नाही. नंतर मयताच्या नातेवाईकांनी सोपस्कर पणें सर्वांच्या उपस्थितीमध्ये मयताच्या  अंत्यविधी करून टाकला.त्यानंतर आरोपी इसमांनी त्यांचे वडील प्रमोद उर्फ दादा फडतरे यांना डॉक्टर पवार यांच्या दवाखान्यामध्ये ऍडमिट केले. दादा फडतरे हेसुद्धा वयोवृद्ध असल्याने व त्यांना घटनेचा शॉक असल्याने त्यांनी काहीही सांगितले नाही. त्यांना रेगुलर व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास आहे त्यांच्या अंगावर काठीच्या जखमा व काळेनिळे वन होते तरीही त्याबाबत येथे काही बोलत नव्हते काही दिवस गेल्यानंतर त्यांनी सदर घटनेबाबत डॉक्टर पवार यांना हकिकत कथन केली. परंतु डॉक्टर पवार हे त्यांचे फॅमिली डॉक्टर असल्याने व प्रमोद फडतरे हे आरोपी यांचे वडील असल्याने त्यांनी कोणत्याही प्रकारची फिर्याद दिली नाही. घटना क्रमा मध्ये डॉक्टरांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले नंतर दखलपात्र गुन्हा डॉक्टरांच्या जबाबावरून निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून आरोपी ऋषिकेश फडतरे व त्याची बहीण यांनी गुन्हा केल्याची कबुली प्रथम डॉक्टरांकडे दिल्याने व साक्षीदार प्रमोद फडतरे यांनी सुद्धा घटनेबाबत डॉक्टरांना सांगितल्याने त्यांची प्रथम खबरी अहवाल घेऊन या दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे दोन्ही आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली. सदर गुन्ह्याच्या तपासाबाबत माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख माननीय अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन व पाठपुरावा केला. सदर आरोपींना आज माननीय न्यायाधीश जाधव मॅडम यांच्यासमोर हजर केले असता त्यांना चार दिवस पोलिस कस्टडी मिळाली. सरकारी वकील म्हणून सोनवणे यांनी काम पाहिले. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक. पोलीस उपनिरीक्षक सागर ढाकणे. सहाय्यक पोलीस फौजदार संजय जगदाळे पोलीस नाईक कल्याण खांडेकर पोलीस नाईक दशरथ कोळेकर पोलीस नाईक संजय जाधव व संपूर्ण डीबी पथक करत आहे. सदर ठिकाणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिळवणे व भौतिक पुरावे शोधून आरोपींना जास्तीत जास्त सजा होण्यासाठी पोलीस बारकाईने तपास करत आहेत. यामध्ये कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्यास त्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल या अटीवर त्यांनी तपासामध्ये सहकार्य करावे असे पोलिसांनी आव्हान केले आहे.

No comments:

Post a Comment