उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवास्थानासमोर महिलेचा माजी नगराध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी केला आत्मदहनाचा प्रयत्न.? - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, November 15, 2021

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवास्थानासमोर महिलेचा माजी नगराध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी केला आत्मदहनाचा प्रयत्न.?

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवास्थानासमोर महिलेचा माजी नगराध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी केला आत्मदहनाचा प्रयत्न.?
बारामती(संतोष जाधव):- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील सहयोग सोसायटी येथे रस्त्यालगत पीडित महिलेने आत्मदहन करण्याचा केलेला प्रयत्न अखेर बारामती पोलिसांनी हाणून पाडला,याबाबत समजलेली माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष व बारामती शहरातीलमाजी नगराध्यक्ष / उद्योजक यांनी एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पुण्यातील एका पीडित महिलेने केला आहे.गेल्या १३ वर्षापासून या महिलेवर
या उद्योजकाने व माजी नगराध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष यांनी वेळोवेळी लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप या
महिलेने केला आहे.वारंवार पुण्यातील पोलिस ठाण्यात जाऊनही तिला न्याय न मिळाल्याने शेवटी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती मधील सहयोग सोसायटी येथील निवास स्थानासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.मात्र पोलिसांना
या घटनेची माहिती आधीच मिळाल्याने त्या ठिकाणी जात पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेत,तिला आत्मदहना पासून रोखत महिला पोलीस कर्मचार्यांच्या मदतीने ताब्यात घेतले.या महिलेने माजी नगराध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष च्या विरोधात बिबेवाड़ी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे मात्र,पुण्यातील पोलीस अधिकार्यांनी वारंवार टाळाटाळ करत जाणीपूर्वक त्या पदाधिकार्यांशी व उद्योजकाबरोबर हितसंबंधात जोपासत दुर्लक्ष केले असल्याने,नाइलाजास्तव तिला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती शहरातील सहयोग या निवासस्थानी आत्मदहन करण्यासाठी यावे लागले मात्र याबाबतची माहिती शहर पोलिसांना अगोदरच मिळाल्याने ती महिला पोहचताच,पोलिसांनी तिला ताब्यात घेत या महिलेला आत्मदहनाचा पासून रोखले.तसेच शहर पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी निर्भया पथकाद्वारे या महिलेचे समुपदेशन
करीत कायदेशीर मार्गाने लढावे असा यापुढे आपण अशा प्रकारचे पाऊल उचलणार नसल्याचे या महिलेकडून लेखी घेतले घेण्यात आले या महिलेचा जवाब घेत,पुणे ग्रामीण अधीक्षक कार्यालयातून पुणे शहर आयुक्तांकडे तसा अहवाल बारामती शहर पोलिसांनी बिबेवाडी पोलीस स्टेशनला पाठवुन दिला.याध्ये जर मला न्याय मिळाला नाही,तर मला आत्मदहन
करण्याशिवाय पर्याय नाही,तसेच ह्या पीडित महिलेने या उद्योजकाने व माजी पदाधिकार्याने बळजबरी करून आपले अश्लील फोटो काढले असून,याद्वारे मला ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार सुरू आहे. तसेच मला मारहाण करून पैसे माझ्या हातात देत,माझे पैसे घेतल्यावेळीचे फोटो काढुन माझी बदनामी करण्याचे काम हे उद्योजक व पदाधिकारी करीत असल्याचा आरोप
या महिलेने केला असल्याचे समजते, दिवसभरात झालेल्या या घडामोडीचा व सोशल मीडिया, फेसबुकवर व्हायरल झालेल्या व्हिडीओ मुळे सर्वत्र चर्चा होऊ लागल्या तर काही सामाजिक महिला मंडळी याबाबत पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी निवेदन देणार असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment