मातोश्री रेसिडेन्सीने राबवली "एक कुटुंब,एक झाड" संकल्पना
प्रतिनिधी – बारामती दि. 24 नोव्हेंबर रोजी तांदूळवाडी येथील अजित बेलदार पाटील यांनी रेवती कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून मातोश्री रेसिडेन्सी या गृह प्रकल्पाच्या फ्लॅट धारकांना ‘एक कुटुंब एक झाड’ ही संकल्पना राबवत प्रत्येकाला एक झाड देऊन संगोपनाचा संकल्प करून दिला.महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वृक्ष व झाडांवरती असलेले प्रेम पाहता, बारामती मध्ये अनेक सामाजिक संघटना/ पक्षाचे पदाधिकारी वेगवेगळ्या माध्यमातून वृक्षारोपण करत असतात आपल्या नवीन गृह प्रकल्पाचा शुभारंभ होतोय हे औचित्य साधत अजित बेलदार पाटील यांनी आपल्या आई वडिलांच्या हस्ते प्रत्येक फ्लॅट धारकांना एक झाड देऊन सन्मान केला व परिसरात वृक्षारोपण केले. शुभकार्यक्रमासाठी शुभमुहूर्त पाहिला जातो, परंतु शुभकार्याला शुभकृतीची जोड अशाच माध्यमातून दिसून येते. या दरम्यान परिसरातील नागरिकांनी व उपस्थितांनी या कार्यक्रमाचे कौतुक व अभिनंदन केले.यावेळी अजित बेलदार पाटील, वाघे असोसिएट्स चे सतीश वाघे, पत्रकार योगेश नालंदे, निवेदक धनंजय माने , सर्व फ्लॅट धारक व इतर मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment