बारामती:- दिनांक 25 11 21 रोजी बारामती शहर पोलीस ठाण्यात ससून हॉस्पिटल या ठिकाणी कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी कळवले की एक अल्पवयीन बारामती शहरातील अमराई मध्ये राहणारी पीडित मुलगी वय 15 वर्ष ही साडे चार महिन्याची गरोदर असल्याने ससून हॉस्पिटल या ठिकाणी गर्भपातासाठी दाखल झालेली आहे. सदर मुलगी अल्पवयीन असल्याने त्याबाबत पुढील कारवाई करावी
सदरचा संदेश प्राप्त होताच प्रकरणाचे गांभीर्य ओळखून बारामती शहर पोलीस ठाणे कडील पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील व पोलीस हवालदार कोठे कांबळे चव्हाण हे ससून रुग्णालयात गेले त्याठिकाणी त्यांनी सदर पीडित मुलीचा व तिच्या आईचा जबाब नोंद केला सदर पीडित मुलीने सांगितले की ती मोरगाव रोड कडे एका शाळेत जात असताना तिची एका मुलाबरोबर ओळख झाली दोन-तीन वेळा तो तिला रस्त्यातच भेटला त्याने तिला फूस लावली व त्यामधून दोन चार वेळा त्यांचे शारीरिक संबंध कॅनॉल च्या कडेला आले त्यातून ती गरोदर राहिली तिची मासिक पाळी चार महिन्या पासून चुकल्याने तिच्या आईने तिला विचारल्यावर तिने वरील प्रकार तिला सांगितला इकडे समाजात व बारामतीत चर्चा होईल म्हणून आईने सदर मुलीला ससून या ठिकाणी नेले त्या ठिकाणी तिला दाखल केल्यावर पोलिसांना माहिती मिळाली. सदर मुलीस आरोपीचे नाव गाव पत्ता विचारले असता तिला सदर आरोपी बद्दल काहीही माहित नाही केवळ तिने पोलिसांना माहिती दिली की त्याच्या हातावर बदाम व हातावर सागर असे गोंदलेले आहे या व्यतिरिक्त कोणतीही माहिती पीडित मुलीने व तिच्या आईने दिली नाही पोलिसांनी सदर महिलेच्या जबाबा वरून 26 11 21 रोजी गुन्हा दाखल केला
अद्याप पर्यंत सदर मुलगी ससून हॉस्पिटल या ठिकाणी गर्भपातासाठी दाखल आहे पोलिसांनी सदर मुलीने दिलेल्या वर्णनावरून बारामती शहरांमध्ये त्यांचे गोपनीय जाळे पेरून तपास सुरू केला. आणि बारामती शहराच्या तपास पथकास काल रात्री माहिती मिळाली की सदर मुलीबरोबर शारीरिक संबंध ठेवणाऱ्या इसमाचे नाव सलीम उर्फ सागर इक्बाल मुश्रीफ वय पंचवीस वर्ष धंदा क्लिनर राहणार गुजीबावी तालुका बारामती मूळ राहणार लक्ष्मीनारायण नगर बारामती शहर असे आहे सदर आरोपीला ताब्यात घेऊन त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. त्याच्या हातावर पीडित मुलीने सांगितल्याप्रमाणे टॅटू चे वर्णन पण मिळून आले त्याला सदर पीडित महिलेच्या जबाबामुळे वरून 26 11 21 ला दाखल असलेला भादवि कलम 376 व पॉस्को कायद्याप्रमाणे च्या गुन्ह्यांमध्ये तात्काळ अटक केली. सदर केसमध्ये पोलीस सदर पीडित मुलीचे डी एन ए तसेच सदर आरोपीचे देणे व गर्भाचे देणे घेऊन पडताळणी करण्यासाठी रासायनिक प्रयोगशाळेत पाठवणार आहेत. सदरचा प्रकार गंभीर असल्याने माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते व उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी सदर गुन्हा उघड करण्यासाठी पोलिसांना सक्त आदेश दिले होते सदर गुन्हा बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे तुषार चव्हाणमनोज पवार, दशरथ कोळेकर, कल्याण खांडेकर,बंडू कोठे, यांनी तपास करून कौशल्याने उघड केलेला आहे. सदर आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा करण्यासाठी येणे सारखा शास्त्रोक्त पुरावा उपयुक्त ठरणार आहे. पीडित मुलीकडून कोणतेही नाव माहीत नसताना केवळ आरोपीच्या हातावरील टॅटू वरुन सदर आरोपी अटक केलेला आहे.
No comments:
Post a Comment