बारामतीत रेशनिंगचा काळाबाजार होतो हे झालं पुन्हा एकदा सिद्ध,'बारामती मध्ये रेशनिंगचा माल खुल्या बाजारात विकणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल, 1 लाख 68 हजारांचा मुद्देमाल जप्त...
बारामती : बारामती शहर व तालुक्यातील रेशनिंगचा माल काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याबाबत अनेक वेळा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या परंतु तहसील कार्यालय याकडे दुर्लक्ष करीत असल्याने अश्या काळा बाजार करणार्यांना एक प्रकारचा विश्वास झाला होता की काय आपल्यावर कारवाई होणारच नाही अशीही चर्चा होत होती, नुकताच शहरामध्ये गरजूंना आलेला रेशनिंगचा तांदूळ संगनमताने खुल्या बाजारात विकणार्या दोघांवर बारामती शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून 30 पोती तांदूळ आणि एक चारचाकी वाहन असा 1 लाख 68 हजार 25 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याप्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशनचे पो.ना.दशरथ कोळेकर यांनी आरोपी वसंत सोमनाथ पोटे (रा.खटिक गल्ली बारामती), वैभव भारत दनाने (रा. तांदुळ वाडी रोड बारामती) यांच्या विरोधात
फिर्याद दिली असून बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये या दोन आरोपींवर गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्वस्त धान्य दुकानात गरजूंना वितरित होणारा तांदूळ आरोपींनी खरेदी करून तो खुल्या बाजारात चढया भावाने विक्रीकरिता
खाजगी पोत्यामध्ये भरून विनापरवाना मालवाहतूक गाडी क्र. MH 42 AQ
5805 TATA ACE हिच्यामध्ये रेशनिंगचे मालाची विक्री करण्याचे उदेशाने घेवून जात असताना ते पोलिसांना मिळून आले. यामध्ये 18 हजार रुपये किंमतीची 1200 किलो वजनाची तांदूळाने भरलेली एकूण 30 पोती व खाकी रंगाची सरकारी शिक्का असलेली 5 पोती, 1 लाख 50 हजारांची मालवाहतूक करणारी फिक्कट पिवळया रंगाची गाड़ी क्र. MH 42 AQ 5805 TATA ACE, असा एकूण 1 लाख 68 हजार 25 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. दोन्ही आरोपींवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 च्या कलम 3,7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशीच करायची असेल असे अनेक दुकाने तपासणी केल्यास सत्य बाहेर येईल अशी मागणी होताना दिसत आहे.
No comments:
Post a Comment