बारामती व मोहोळ च्या दोघांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी 21 लाखाच्या गुटख्यासह 36 लाखाचा मुद्देमाल केला जप्त.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, December 23, 2021

बारामती व मोहोळ च्या दोघांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी 21 लाखाच्या गुटख्यासह 36 लाखाचा मुद्देमाल केला जप्त..

बारामती व मोहोळ च्या दोघांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी 21 लाखाच्या गुटख्यासह 36 लाखाचा मुद्देमाल केला जप्त..                               बारामती/इंदापूर(संतोष जाधव) :- गुटखा बंदी असताना देखील वारंवार होत असलेल्या करवाईवरून दिसून येत आहे की, आर्थिक तडजोड करून अधिकारी गुटखा विक्रीस परवानगी देत असावी की काय अशी प्रतिक्रिया उमटत असताना दिसत आहे.नुकताच इंदापूर पोलिसांनी गुरुवारी केलेल्या कारवाईत तब्बल 21 लाख रुपयांचा बेकायदा विक्रीस चालवलेला गुटखा पकडला. पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी च्या काळात संशयास्पद हालचाली दिसून आल्याने वाहन थांबल्यानंतर पोलिसांना हा अवैध गुटखा दिसून आला.इंदापूर पोलिसांनी याप्रकरणी गणेश आबासाहेब चव्हाण (वय २५ वर्षे रा. शेटफळ ता. मोहोळ जि.सोलापूर) व गाडीमालक चंद्रकांत क्षीरसागर (रा. बारामती जि. पुणे) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. ही माहिती इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी दिली. गलांडवाडी नजिकच्या ही घटना इंदापूर भागातील नाकाबंदी दरम्यान घडली. पोलिसांनी नाकेबंदी केली होती. या नाकेबंदी दरम्यान पोलीस वाहनांची तपासणी करत होते विनापरवाना वाहन चालविणारे तसेच कागदपत्रे असलेली वाहने यांची खातरजमा केली जात असतानाच समोरून वाहन (क्रमांक एम.एच.45 ए.ई.5348) हा टेंम्पो निघाला.पोलिसांना या टेम्पो मधील हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांनी टेम्पो थांबवला व तपासणी केली
असता, त्यामध्ये विक्रीसाठी चालवलेला अवैध गुटखा पोलिसांना मिळून आला. यामध्ये गुटख्याच्या दोन कंपनीची 40 पोती आणि 25
बॉक्स असा एकूण 21 लाख रुपयांचा गुटखा आढळून आला.या कारवाईत १५ लाखाचा टेम्पो पोलिसांनी जप्त केला असून एकूण 36 लाखाचा मुहद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक टी.वाय. मुजावर, फौजदार दाजी देठे, पोलीस नाईक मनोज गायकवाड व पोलीस नाईक निलेश फडणीस यांनी केली.                                याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बारामतीत गुटखा बंदीच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे दिसत आहे कारण बारामती मध्ये देखील खुलेआम गुटखा विकला जातो तो कुठून येतो कुणाचा त्याला आशीर्वाद आहे हे तपासणे गरजेचे आहे अशी मागणी होताना दिसते.

No comments:

Post a Comment