पोलिसांचे 'ऑल आऊट कोम्बिंगऑपरेशन, 3213 जणांच्या तपासणीदरम्यान 33 कोयते, 8 तलवारी, चॉपर जप्त; 13 आरोपींना अटक,38 केसेस दाखल..बारामतीत कधी?
पुणे :- वाढती गुन्हेगारी पाहता सर्वसामान्य माणसाला भीतीमय वातावरण निर्माण झाले आहे अवैध धंदे करून वाढत चाललेली गुन्हेगारी ही एक प्रकारे माफिया गॅंग तयार होत असून याला राजकिय पुढारी पाठीशी घालत असल्याचे दिसत आहे, पुणे शहराबरोबरच पुणे ग्रामीण भागातही वाढती गुन्हेगारी डोकेदुखीची ठरत आहे, पाठीशी घालणे म्हणजे पुन्हा गुन्हा करण्यास तयार होणे अशीच सध्याची परिस्थिती निर्माण झाल्यासारखी दिसत आहे, त्यामुळे या गुन्हेगारी माफियांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी ग्रामीण भागात देखील 'ऑल आउट कोंबिंग ऑपरेशन'राबविणे गरजेचे आहे, नुकताच पुणे शहरातील सर्व पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेच्या वतीने ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार तसेच गुन्हे शाखेची पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी शहरातील वेगवगेळ्या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन व तपासणी करुन कारवाई केली. हे कोम्बिंग ऑपरेशन बुधवारी(दि.15) रात्री 11 ते गुरुवारी (दि.16) मध्यरात्री एक या कालावधीत राबवण्यात आले.पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये कोम्बिंग ऑपरेशन करुन गु्हेगारांना चेकींग करुन प्रतिबंधक कारवाई करणे, हॉटेल, लॉज, ढाबे,
एस.टी व बस स्थानके रेल्वे स्टेशन तसेच सार्वजनिक ठिकाणी आढळून येणारे संशयीत व्यक्ती, घटना इत्यादींची कसून तपासणी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या
मोहीमेत तब्बल 3213 गुन्हेगारांना चेक करण्यात आले असून त्यापैकी 817 गुन्हेगार मिळून आले आहेत.कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान 10 हजार 720 रुपयांचे 33 कोयते, 3700 रुपयांच्या 8 तलवारी, 500 रुपयांचा एक चॉपर जप्त करुन 13 आरोपींना अटक केली आहे. तर 38 केसेस
दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई स्वारगेट सहकारनगर ,वारजे माळवाडी, सिंहगड रोड हडपसर ,लोणी काळभोर आणि गुन्हे शाखेच्यापथकाने ही कारवाई केली आहे. फरासखाना,बंडगार्डन,चंदननगर गुन्हे शाखा युनिट एकने खडक पोलीस ठाण्यात
दाखल असलेल्या गुन्ह्यात करण उर्फ ठोम्ब
भानुदास आगलावे (वय-18), नामदेव महेंद्र
कांबळे (वय-21) याला अटक केली आहे तर
एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 6 हजार रुपये किंमतीचे 10 किलो तांब्याचे पाईप जप्त केले. तर युनिट तीनच्या पथकाने भोसरी पोलीस ठाण्यात असलेल्या गुन्ह्यात पाहिजे असलेला सराईत
गुन्हेगार अक्षय उर्फ जंगल्या राजु भालेवर (वय-25 रा. महादेव आळी, दापोडी गावठाण)याला अटक केली.गुन्हे शाखा युनिट पाच च्या पथकाने हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातीलआरोपी पंकज विठ्ठल कांबळे (वय-19, रा.हडपसर) याला अटक करुन एका विधीसंघर्षीत बालकाला ताब्यात घेऊन हडपसर पोलिसांच्या ताब्यात दिले. तसेच युनिट सहाने निगडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी कनवरसिंह कालुसिंग टाक (वय-21 रा.
हडपसर) याला अटक केली.पोलीस स्टेशनने मुंबई प्रोव्हिबिशन अॅट अंतर्गत 18 केसेस दाखल करुन 8 आरोपींना अटक केली आहे.
त्यांच्याकडून 15 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.सीआरपीसी कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत 102 आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.तसेच 181 हॉटेल, लॉजची तपासणी करण्यात आली.
No comments:
Post a Comment