उत्पादन शुल्क'मधील अधिकार्यासह दोघे 50 हजाराची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, December 16, 2021

उत्पादन शुल्क'मधील अधिकार्यासह दोघे 50 हजाराची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात...

'उत्पादन शुल्क'मधील अधिकार्यासह दोघे 50 हजाराची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात...
 ठाणे : - वारंवार तक्रार करूनही कुठलीच कारवाई न होण्यामागे काय कारण असू शकते हे लाच घेतलेल्या प्रकरणावरून दिसून येते नुकताच वाईन शॉपवर कारवाई न करण्यासाठी 50 हजार 300 रुपयांच्या लाचेची मागणी करणार्या राज्य उत्पादन शुल्क बड्या अधिकार्यांसह दोघांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. दुय्यम विभागाच्या निरीक्षक गोसावी कोपरी, ठाणे आणि खासगी व्यक्ती उमेश
राठोड अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई गुरुवारी (दि.16) केली आहे.
दोघांविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.तक्रारदार यांनी चालविण्यासाठी घेतलेल्या वाईन शॉपवर 11 नोव्हेंबर 2021 रोजी उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली होती. या कारवाईमध्ये मदत करण्यासाठी आणि भविष्यात कोणतीही कारवाई न करण्यासाठी दुययम निरीक्षक गोसावी यांनी स्वत:साठी तसेच राज्य उत्पादन शुल्काच्या कोपरी येथील इतर अधिकाऱ्यांसाठी दरमहा 64 हजार रुपयांचा हप्ता मागितला.लाचेची ही रक्कम स्विकारण्यास खासगी व्यक्ती उमेश राठोड याला प्रोत्साहित केले.गोसावी यांनी मागणी केलेल्या लाचेच्या
रक्कमेत राठोड याने तडजोड करुन 50 हजार
300 रुपयांची मागणी केली.याप्रकरणी तक्रारदाराने 11 नोव्हेंबर रोजी ठाणे
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.
पथकाने 12 नोव्हेंबर रोजी याची पडताळणी
करुन 16 डिसेंबर रोजी दुपारी तीनच्या
सुमारास कोपरी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध
गुन्हा दाखल करुन अटक केली..

No comments:

Post a Comment