लैंगिक दृष्ट्या कमजोर पतीने 7 ते 8 जणांना पत्नीशी ठेवायला लावले शारीरिक संबंध, सलग तीन वर्षे बलात्कार केल्याची फिर्याद दाखल..
बारामती:- शहर पोलीस ठाण्यात एक असा गुन्हा
दाखल झाला आहे, ज्या घटनेने बारामतीत धक्कादायक प्रकाराने पती लैंगिक दुर्बल असल्याने त्याने पत्नीशी जबरदस्तीने सात ते
आठ जणांना शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडले आणि हा प्रकार तीन वर्ष सुरू होता, अशा प्रकारचा गुन्हा बारामती शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला असून पोलिसांनी या प्रकरणी पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये पतीसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. हा गुन्हा 9 डिसेंबर रोजी बारामती शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला असून, त्याची जाहीर वाच्यता केली जात नव्हती. या संदर्भातील बारामती शेजारच्या एका गावातील पीडित महिलेने पतीला लैंगिकदृष्ट्या
दिलेल्या फिर्यादीनुसार कमजोरी असल्यामुळे त्याने त्याच्या लैंगिक भावना उत्तेजित करण्यासाठी काही मित्रांना घरी आणून
त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले.
यासंदर्भात पीडितेच्या मोबाईलवरून संबंधित
मित्रांना मेसेज करून बोलवले जायचे. पीड़ितेने
वेळोवेळी विरोध केल्यानंतर तिच्या पतीने तिला
जीवे मारण्याची धमकी दिली, तसेच इतरांना
कोणाला सांगू नये यासाठी तो सतत तिच्याबरोबर
असायचा.हा प्रकार सन 2017 ते 2021 च्या जुलैमहिन्यापर्यंत सुरू होता. अखेर त्रास सहन न
झाल्याने पीडित महिला तिच्या माहेरी निघून आली आणि तिने घडलेला सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यावरून पीडितेने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून बारामती शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तिच्या पतीसह ,व इतर अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल केला.यातील पतीला व यास पोलिसांनी नऊ डिसेंबर रोजी अटक केली असून, तिघांना 11 डिसेंबर रोजी अटक केली. आज न्यायालयाने दिलेली पोलिस कोठडी संपल्यानंतर बारामती जिल्हा व सत्र न्यायालयात या पाच जणांना हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली.
No comments:
Post a Comment