पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई, 9 लाखांचा गांजा व गांजाची झाडे जप्त, 6 जणांना अटक... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, December 4, 2021

पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई, 9 लाखांचा गांजा व गांजाची झाडे जप्त, 6 जणांना अटक...

पुणे ग्रामीण पोलिसांची  धडक कारवाई, 9 लाखांचा गांजा व गांजाची झाडे जप्त, 6 जणांना अटक...
पुणे:- पुणे जिल्ह्यातील नारायणगाव, भिगवण, शिरुर, ओतुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ विरोधी  विशेष मोहीमेंतर्गत पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून पाच ठिकाणी छापे टाकण्यात आले.नारायणगाव, भिगवण, शिरुर, ओतुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या कारवाईत 9 लाख 28 हजार 395 रुपये किमतीचा 76 किलो
980 ग्रॅम वजनाचा गांजा आणि गांजाची झाडे जप्त केली आहेत. तर सहा जणांना अटक करण्यात आली आहे. 10 नोव्हेंबर पासून ही मोहिम राबवली जात आहे. ओतुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 16 नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या कारवाईत एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली. धर्मा कोकाटे (रा.
सत्तू पारगाव) व हसीना अमन तकी (रा. मोमीन
गल्ली, जुन्नर) यांना अटक केली आहे.त्यांच्याकडून 260 ग्रॅम वजनाचा ओलसर
गांजा, डिडीटल काटा असा एकूण 3080 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.शिरुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 18 नोव्हेंबर रोजी कारवाई करुन रत्नाबाई चंदर गव्हाणे (रा. होलारआळी,शिरूर) या महिलेला ताब्यात घेण्यात आले.आरोपी महिलेकडून 1200 रुपये किमतीचा 125 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. तर 19 नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या कारवाईत शांताराम बाबुराव ढोबळे उर्फ बापु महाराज (रा.हनुमान मंदीर, मठ काठापुर खुर्द, ता. शिरुर)याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 10 किलो ओलसर गांजा आणि 31 किलो 445 ग्रॅम वजनाची 14 ओली झाडे, तीन नग सांबार जातीच्या प्राण्याचे शिंगे, कातडे असा एकूण 2 लाख 57 हजार 225 रुपयांचा मुद्देमाल जप्त आला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 18 नोव्हेंबर रोजी कारवाई करुन सुनिल अनिल जाधव (रा. सासवड) याला अटक करुन 34 किलो 64 ग्रॅम वजनाचा गांजा व दुचाकी जप्त केली. या कारवाईत पोलिसांनी 6 लाख 9 हजार 240 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. नारायणगाव पोलीस ठाण्याच्या 22 नोव्हेंबर रोजी केलेल्या कारवाईत 510ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला.
याप्रकरणी युवराज पांडुरंग राठोड (रा.जांबुतफाटा कांदळी) याच्यासह दोघांना अटक केली.त्यांच्याकडून 57 हजार 650 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाई संदर्भात पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले की एन.डी.पी.एस कायद्यांतर्गत गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येत आहे.
जिल्ह्यातून अवैध अंमली पदार्थ विक्री व लागवड यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी
पोलिसांकडून यापुढेही कडक कारवाई      करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment