लाच प्रकरणात पोलीस हवालदाराचा जामीन मंजूर
बारामती(संतोष जाधव):- बारामतील येथील जिल्हा न्यायाधीश मे.दरेकर मॅडम यांनी पोलीस हवालदार माणिक ज्ञानदेव गदादे यांचा रक्कम रु. ३०,०००/- बंदपत्रावरती जामिन दि. ०९/१२/२०२१ रोजी मंजूर केला. आरोपीचे वतीने ॲड. विनोद जावळे यांनी काम पाहिले.दि. १९/१०/२०२१ रोजी लोकसेवक आरोपी याने मांढरदेवी सातारा येथून स्कॉपियो गाडी ताब्यात घेवून बारामती येथे आले व फिर्यादी श्रीमती अक्का शेंडगे मुळ मालक स्कॉपियो यांना रक्कम रु. २,००,०००/- लाचेची मागणी केली. तुमची गाडी चोरीची आहे. सोडावयाची असेल तर पैसे दयावे लागतील आम्ही सातारा एल.सी. बी. पोलीस आहोत. असे म्हणुन तडजोड अंती मागणी रक्कम ५०,०००/- ठरली. दि. २१/१०/२०२१ रोजी इंदापुर रोड बारामती येथे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. परंतु त्यापुर्वीच आरोपीने गाडी सोडुन दिली. अशा आरोपाखाली आरोपीस दि. ७/१२/२०२१ रोजी बारामती जिल्हा न्यायालयाचे परिसरात अटक केली. सदर आरोपी पोलीस हवालदार हा गेली सात महिन्यापासुन जिल्हा न्यायालयात कोर्ट गार्ड डयुटी वर नेमणुकीस होता . आरोपीस अटक होऊन मे कोर्टात हजर केले असता, मे कोर्टाने आरोपीस १ दिवसाची पोलिस कस्टडी दिली. तदनंतर आरोपीस न्यायालीन कोर्टाचा आदेश झाला व आरोपींच्या वतीने जामीन मिळणे कामी जामिन अर्ज दाखल करण्यात आला. जामीन अर्जावर आरोपीच्या वतीने युक्तीवाद करताना ॲड विनोद जावळे यांनी लाचलुचपत प्रतीबंधक कायदा कलम ७ हे लागु होत नाही व आरोपीने कोणत्याही रक्कमेचा स्वीकार केला नाही. आरोपीने प्रत्यक्षरित्या फिर्यादीस रक्कमेची मागणी केली नाही, जबाबमध्ये आरोपीवर लाच रकमेची मागणी केलेला आरोप नाही. घटना घडलेनंतर ४६ दिवसांनी गुंन्हा दाखल करण्यात आला. आरोपीचा गुन्हयाशी कोणताही संबंध नाही. आरोपी गुन्ह्याच्या कामी तपास अधिकारी यांना सहकार्य करण्यास तयार आहे असा विविध मुदयावर युक्तीवाद मे. कोर्टाने ऐकून घेऊन आरोपीची रक्कम रुपये तीस हजार चे जामीनावर मुक्तता करण्यात आली. आरोपीच्या वतीने अँड. विनोद जावळे यांनी कामकाज पाहिले तसेच ॲड. प्रणिता जावळे, ॲड. कीर्ती कवडे, ॲड. राहुल शिंदे, ॲड. विशाल मापटे ,ॲड. मानसी गायकवाड, यांनी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment