म्हाळसाकांत पाणी पुरवण योजनेची पाहाणी.
लोणी-धामणी : (प्रतिनिधी-कैलास गायकवाड).
दिः१२/१२/२०२१. गेल्या आठवडयात गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईमध्ये मंत्रालय या ठिकाणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या सोबत बैठक झाली.व म्हाळसाकांत पाणी पुरवठा योजना कशी राबवायची या संदर्भात चर्चा झाली.त्यावेळी लोणी-धामणी परीसरातील आठ गावातील सरपंच व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.त्याच पार्श्वभूमीवर म्हाळसाकांत पाणी पुरवठा योजना संदर्भात जलसंपदा विभाग पुणे येथील मुख्यअभियंता सांगळे व घोडेगाव येथील जलसंपदा विभागाचे अधिकारी माने व देवरे तसेच शरद बँकेचे संचालक अशोक आदक पाटील, सतिश जाधव,बाळशिराम वाळुंज,गुरुदेव पोखरकर व स्थानिक ग्रामस्थ यांनी म्हाळसाकांत पाणी योजना संदर्भात आज प्रत्यक्ष ठिकाणी येऊन विविध जागांची पाहणी केली. आंबेगावच्या पूर्व पट्टयातील आठ गावे नक्कीच लवकरच पाणीदार होणार आहेत.यात तिळमात्र शंका नाही.यासाठी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या गटाचे जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील हे या योजनेवर विशेष लक्ष देत आहेत.
No comments:
Post a Comment