अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी सागर उर्फ संदीप महादेव निकम यास ७ वर्षाची सक्तमजुरी... बारामती:- दि ४/७/२०१९ रोजी अल्पवयीन मुलीचा विनयभंग व अत्याचार प्रकरणी सागर उर्फ संदीप महादेव निकम रा. झारगडवाडी ता. बारामती जि. पुणे यास बारामती येथील मे. अतिजिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. आर. व्ही. लोखंडे यांनी सदर आरोपीस बालकांचे संरक्षण कायदा कलम ९ प्रमाणे७ वर्षाची सक्तमजुरी व १०.०००/-दंडाची शिक्षा दिली. तसेच दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त ६ महिने कठोर कारावासाची शिक्षा सुनावली. यामध्ये फिर्यादीने बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती त्यावर तपासी अधिकारी नारायण शिरगावकर यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले, सदर सेशन केसमध्ये सरकार पक्षातर्फे साक्षीदार तपासण्यात आले. सदर खटल्यामध्ये ऍड नवले कमलाकर शंकरराव यांनी केलेला युक्तिवाद व पुरावा आधारे मे. कोर्टाने आरोपीस शिक्षा सुनावली सदर प्रकरणी बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण पोलीस अधिकारी म्हणून कामकाज पाहिले आहे, तसेच पोलीस हवालदार अभिमन्यू कवडे यांनी केस कामी मोलाची मदत केली आहे.
Post Top Ad
Thursday, December 23, 2021
Home
ताज्या घडामोडी
बारामती
अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी सागर उर्फ संदीप महादेव निकम यास ७ वर्षाची सक्तमजुरी...
अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी सागर उर्फ संदीप महादेव निकम यास ७ वर्षाची सक्तमजुरी...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment