बेचाळीस वर्षांनी भरला दहावीचा वर्ग.!!
वार्ताहर (कैलास गायकवाड )
लोणी-धामणी: - दि.25-12-2021 लोणी (ता.आंबेगाव) येथे श्री.भैरवनाथ विद्या द्याम प्रशाला माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दहावीच्या माजी विद्यार्थ्याचा मेळावा आयोजित केला होता, पण यावेळी सर्व विध्यार्थी निवृत्त व शिक्षक ही निवृत्त .अशी वेळ होती. माजी प्राचार्य स.ल. शिंदे, माजी शिक्षण अधिकारी वीर सर, प्राचार्य अरुण साकोरे सर. चौधरी सर, पठारे सर, दळवी सर, गावडे सर 1978-79 च्या बॅचचे विद्यार्थी माजी जिल्हा कृषी अधिकारी प्रकाश सोनवणे, उद्योजक दामोदर वाळुंज, बँक अधिकारी कैलास सिनलकर, माजी पीएसआय रंगनाथ वाळुंज, माजी सनदी अधिकारी शांताराम वाळुंज , समाज भूषण कैलास गायकवाड, दत्ता कदम, रामदास थोरात, विकास शाह विलास रोकडे, माजी सैनिक तुकाराम वाळुंज, शरद वाळुंज, प्रकाश सांडभोर, शरद वाळुंज पांडुरंग सुक्रे, कैलास सुक्रे, अलका दौंडकर(सोनवणे ) मंदा वाळके, मनीषा सिनलकर, अण्णा सिनलकर माजी विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील गमती-जमती व आपल्या जीवनाचे अनुभव सांगून जुन्या गोष्टींना उजाळा देताना सर्वांचे मन भरून आले होते.व नकळत का होईना, माजी विद्यार्थ्यांच्या डोळ्याच्या कडा पानविल्या होत्या.यावेळी 1978-79या माजी विद्यार्थ्यांनी बांधकाम चालू असलेल्या इमारतीसाठी 41000 हजार, रुपयांची देणगी दिली.शेवटी मासवडी जेवणाचा अस्वाद घेऊन पुन्हा एखदा एकमेकांना भेटण्याचे पक्के ठरून निरोप घेतला.या वेळी सुभाष महादेव जाधव यांनी 58000हजार रुपये ची देणगी शालेय व गावच्या विकासासाठी दिली.
No comments:
Post a Comment