जुनी कचेरी ते भिगवण चौकापर्यंत व शिवाजी चौक ते तांदूळवाडी वेस चौक या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह बांधणे करिता संतोष जाधव पत्रकार यांनी दिलेल्या पत्राला मिळाले लेखी आश्वासन... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, December 16, 2021

जुनी कचेरी ते भिगवण चौकापर्यंत व शिवाजी चौक ते तांदूळवाडी वेस चौक या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह बांधणे करिता संतोष जाधव पत्रकार यांनी दिलेल्या पत्राला मिळाले लेखी आश्वासन...

जुनी कचेरी ते भिगवण चौकापर्यंत व शिवाजी चौक ते तांदूळवाडी वेस चौक या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह बांधणे करिता संतोष जाधव पत्रकार यांनी दिलेल्या पत्राला मिळाले लेखी आश्वासन...                                                                                      बारामती:- गेल्या अनेक वर्षांपासून खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांसाठी भेडसावत असणारा प्रश्न होता की या पेठेत सार्वजनिक स्वच्छता गृह असावे परंतु ते होऊ न शकल्याने अखेर दोन वर्षांपूर्वी महिला भगिनींना घेऊन आमरण उपोषण केले होते ते चार दिवस चालू होते त्यावेळी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष, गटनेता व काही नगरसेवक यांच्या मध्यस्थीने हे लेखी आश्वासन दिल्याने माघारी घेण्यात आले होते परंतु आजतागायत या भागात अथवा या बाजार पेठेत सार्वजनिक स्वच्छता गृह बांधले नसल्याने पुन्हा श्री. संतोष पोपटराव जाधव पत्रकार, बारामती यांनी कचेरी रोड ते मारवाड पेठ या रस्त्यालगत ग्राहकांसाठी सार्वजनिक स्वच्छता गृह होणे बाबत दिनांक ०१/१२/२०२१ रोजीचा अर्ज दिला होता त्या अर्जामध्ये दिनांक ०१/१२/२०२१ रोजीच्या उपरोक्त पत्रान्वये जुनी कचेरी ते भिगवण चौकापर्यंत व शिवाजी चौक
ते तांदूळवाडी वेस चौक या पेठेमध्ये ग्राहकांची सतत ये जा व गर्दी असते, बाहेरुन येणा-या महिला भगिनी यांच्यासाठी दुकानदारांनी स्वच्छता गृहाची व्यवस्था करणे गरजेचे होते, परंतु तसे दिसत नसल्याने बारामती
नगरपरिषदेने तात्काळ सदरहू ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहाची सोय करावी अशीच मागणी काही वर्षापूर्वी आमरण उपोषण करुन महिलांनी केली होती, परंतु तात्पुरते आश्वासन देवून अद्यापर्यंत या भागात स्वच्छता गृहाची सोय
झालेली नाही, तरी तात्काळ स्वच्छतागृहाची सोय करावी अन्यथा दिनांक १२/१२/२०२१ उपोषणास बसणार असल्याचे कळविलेले होते त्याअनुषंगाने.बारामती नगरपरिषद मा. विशेष सभा दिनांक ०७/१२/२०२१ मध्ये शहरात सार्वजनिक शौचालय बांधणे बाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार बारामती नगरपरिषद जुनी कचेरी ते भिगवण चौकापर्यंत व
शिवाजी चौक ते तांदूळवाडी वेस चौक या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह बांधणे करिता जागेचा सर्वे करुन जागा उपलब्ध होताच सदर ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्याची पुढील कार्यवाही नगरपरिषदेमार्फत करण्यात
येईल असे लेखी पत्र देऊन दिनांक १२/१२/२०२१ रोजीचे नियोजीत उपोषण मागे घेण्याबाबत आपणास विनंती करण्यात येत आहे असे लेखी पत्र महेश रोकडे मुख्याधिकारी बारामती नगरपरिषद,बारामती यांनी दिले होते.

No comments:

Post a Comment