*राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांनी केले उबाळे कुटुंबीयांचे सांत्वन.*
वालचंदनगर:- श्रीमती सावित्रीमाई भागवत उबाळे, वालचंदनगर, राष्ट्रसंत गाडगेमहाराज यांचा प्रत्यक्ष दर्शन व आशिर्वादछाया लाभलेल्या यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी दि.१९/१२/२०२१ रोजी
वृद्धापकाळाने परिनिर्वाण झाले. अंत्ययात्रा व दहन विधी वालचंदनगर येथील राहत्या निवासस्थान क्षेत्रातील जागेत येथे दुपारी ३ वाजता झाले आहे. पुण्यानुमोदन कार्यक्रम मंगळवार दि.२१ डिसेंबर रोजी झाला, त्यांच्या पश्र्च्यात ३ मुले ४ सुना व नातवंडे, परतूंड असा परिवार आहे. त्या माजी पंचायत समितीचे सदस्य दिवंगत शहिद राजदत्त(आबासाहेब) उबाळे व माजी तंटामुक्ती अध्यक्ष सर्जेराव उबाळे (भाऊ), सामाजिक कार्यकर्ते अनिल उबाळे सर यांच्या मातोश्री , व लोकशाही न्यूज (टी व्ही) पत्रकार अभिराज उबाळे (पंढरपूर) तसेच साप्ता.रयतेचा भीमप्रहारचे मुख्यसंपादक भीमसेन सर्जेराव उबाळे व ॲड रणजित राजदत्त उबाळे यांच्या आजी होत.
सावित्रीआई यांचा आदर्श घेण्याजोगा आहे.असे मत राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांनी व्यक्त केले तसेच वीरयोध्दामाता सावित्रीमाई भागवत उबाळे यांना राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक नामवंत मान्यवरांनी आणि विविध पक्षातील व संघटनेच्या पदाधिकारी यांनी आपल्या वाणीने तसेच लेखणीने त्यांच्या स्मृतिंना उजाळा देत त्यांना विनम्र भावनेने अभिवादन केले. त्यांच्या बद्दल आठवणी सांगत असताना अनेकांनी लोप पावत चाललेल्या एकत्र कुटुंब पध्दतीचे जतन हे या काळात सावित्रीमाई उबाळे यांनी केले तसेच वालचंदनगर व पंचक्रोशीमधील एक आदर्श आणि
अनुकरणप्रिय उदाहरण आहे. सावित्रीमाई उबाळे यांचा एकत्र कुटुंब पध्दतीचा आदर्श सर्व समाजातील लोकांनी घ्यावा अशी इच्छाही मान्यवरांनी आपल्या श्रध्दांजलीच्या मनोगतामध्ये व्यक्त केली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, सपकळवाडीचे माजी सरपंच तसेच पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन सपकळ, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नवनाथ धांडोरे, सह इतर मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment