धामणीत बैलगाडा मालकांना पेढे भरून आनंद साजरा.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, December 16, 2021

धामणीत बैलगाडा मालकांना पेढे भरून आनंद साजरा..

धामणीत बैलगाडा मालकांना पेढे भरून आनंद साजरा
----------------------------------------
लोणी-धामणी : (प्रतिनिधी-कैलास गायकवाड.)
दिः१६/१२/२०२१.सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्याने गावोगावी गाडामालकांनी  आनंदोत्सव साजरा केला धामणी(ता. आंबेगाव) येथे बैलगाडा मालकांना ग्रामस्थांनी पेढे ,लाडू भरवले  बैलगाडा शर्यतीच्या निकाल बाबत सर्वांना उत्सुकता लागली होती  शेतकरी आणि बैलगाडा मालक चातकासारखी या निकालाची वाट पाहत होते. मात्र बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिल्याने धामणी आणि परिसरातील बैलगाडा मालक यांनी चौकात फटाके फोडून हा आनंद साजरा केला. नुकताच धामणीत नवीन बैलगाडा घाट बांधण्यात आला आहे. दोन महिन्यावर आलेली खंडोबा यात्रा पाहता हा आनंद नक्कीच द्विगुणित झाला असल्याचे गाडामालक दिलीप वाघ ,भीमराव लंघे, विकास पंचारास ,अक्षय रोडे,दीपक जाधव यांनी सांगितले. या सर्व गाडामालकांना शिरदाळे उपसरपंच मयूर सरडे यांनी पेढे भरवून अभिनंदन केले. यावेळी सर्व गाडामालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment