लोणीच्या उपसरपंचपदी अनिल पंचरास.
_________________________
लोणी-धामणी : (प्रतिनिधी.
कैलास गायकवाड):-. दिः१६/१२/२०२१. लोणी (ता.आंबेगाव ) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिल पंचरास यांची बिनविराध निवड झाली. येथील उपसरपंच माधूरी गायकवाड यांनी राजीनामा दिल्यामूळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदी अनिल पंचरास यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी सरपंच ऊर्मिला धुमाळ, मावळत्या उपसरपंच माधूरी गायकवाड,माजी उपसरपंच सुरेखा थोरात,राणी गायकवाड व चंद्रकांत गायकवाड उपस्थित होते.यावेळी नवनियुक्त उपसरपंच अनिल पंचरास यांचा सत्कार शरद सहकारी बॅकेचे संचालक अशोक आदक पाटील,अवसरी बुद्रुक गण राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष बाळशिराम वाळूंज,जेष्ठ नेते बाळासाहेब वाळुंज,सतिश थोरात यांनी केला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेविका सोनाली जाधव यांनी काम पाहिले.
No comments:
Post a Comment