हेरिटेज वॉकने बारामतीचा इतिहासाला उजाळा.
बारामती:- सर्वांनाच आपला गाव, आपली संस्कृती आपल्या परंपरा याविषयी जिव्हाळा असतो पण जेव्हा याला शास्त्राची जोड मिळते तेव्हा आपल्या गावाचा आपल्या संस्कृतीचा आणि परंपरांचा अभिमान वाटायला लागतो .
शरदचंद्रजी पवार साहेब यांचे सहस्रचंद्रदर्शन वर्ष व 81 व्या वाढदिवसानिमित्त भगिनी मंडळ बारामती व प्रतिबिंब युट्यूब चॅनल यांच्यावतीने बारामतीत आज पहिल्या हेरीटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंटचे ट्रस्टचे अध्यक्ष श्री राजेंद्र पवार, विश्वस्त सौ.सुनंदा पवार , बारामती टेक्स्टाईलच्या अध्यक्षा सौ.सुनेत्रा पवार उपस्थित, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष श्री सदाशिव सातव उपस्थित होते..
बारामतीमधील श्री काशिविश्वेश्वर मंदिर व गुणवडी येथे भारतीय विद्या अभ्यासक श्री राहुल देशपांडे व श्री आशुतोष अभ्यंकर यांनी उपस्थितांना माहिती दिली.
डॉ.राहुल देशपांडे यांनी मंदिर संस्कृती समजावून सांगताना मंदिर कसे पहावे, मंदिराचे विविध भाग, विविध मूर्ती यांचे शास्त्र आणि सौंदर्य उलगडून सांगितले तसेच श्री काशिविश्वेश्वर मंदिर शिवलीलामृत यांच्या नात्यावर प्रकाश टाकला.
मंदिराच्या परिसरातील विविध पुरातत्वीय अवशेष व भैरवनाथ मंदिर याबाबाबत श्री आशुतोष अभ्यंकर यांनी मार्गदर्शन केले.
गुणवडी येथे गजलक्ष्मी, गुनेश्वर मंदिर, सतिशीळा वीरगळ यांची माहिती डॉ. देशपांडे व श्री अभ्यंकर यांनी दिली.हेरीटेज वॉकच्या संकल्पनेचे सौ.सुनेत्रा पवार यांनी स्वागत करत यापुढेही हेरीटेज वॉक सुरू रहावा यासाठी शुभेच्छा दिल्या.
प्रतिबिंब युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बारामतीच्या इतिहासावर उजेड टाकण्याचे काम श्री विनोद खटके व श्री मनोज कुंभार हे विद्या प्रतिष्ठाचे 2 शिक्षक गेल्या 3 वर्षांपासून करत आहेत त्यांच्या कामाचे कौतुक सुनेत्रा पवार यांनी कौतुक केले.
कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्षा जयश्री सातव , राष्ट्रवादीचे गटनेते सचिन सातव, नगरसेविका सई सातव , विद्या प्रतिष्ठानच्या सचिव निलीमा गुजर विश्वस्त श्री राजीव शहा आदी मान्यवर उपस्थित होते. काशिविश्वेश्वर मंदिराचे विश्वस्त कार्यक्रमाची संकल्पना सौ.सुनीता शहा यांनी सांगितली सूत्रसंचालन सौ.वर्षा सिधये यांनी केले.
No comments:
Post a Comment