खडकवाडी येथील तरुण संकेत पोखरकर सब लेफ्टनंट पदी..
लोणी धामणी:- ता. 20 खडकवाडी तालुका आंबेगाव येथील शेतकरी कुटुंबातील तरुण संकेत दत्तात्रय पोखरकर वयाच्या अठराव्या वर्षी एप्रिल 2021 मध्ये झालेल्या यु पी एस सी(एन डी ए ) परीक्षेत उच्च यश संपादन केले. देशपातळीवरील एन आय आर 129रँक प्राप्त केली. इझीमाला (केरळ ) येथील इंडियन नेव्हल अकॅडमी सब लेफ्टनंट वर्ग-1 अधिकारी पदाच्या प्रशिक्षणासाठी त्याची निवड झाली आहे.
संकेत चे शिक्षण प्राथमिक शाळा खडकवाडी येथे झाले असून, त्याचे वडील दत्तात्रेय पोखरकर प्राथमिक शिक्षक आहेत. आई गृहिणी व शेतकरी असून पूर्ण शेतकरी कुटुंब आहे. संकेत चे माध्यमिक शिक्षण पुण्यातील ज्ञान प्रबोधनी प्रशालेत झाले आहे.
तर उच्च माध्यमिक शिक्षण सैनिकी पूर्व प्रशिक्षण संस्था( एस पी आय ) औरंगाबादला झाले आहे. गावात संकेतची निवड झाल्याचे समजताच सरपंच कमल सुक्रे, माजी सरपंच अनिल डोके, एकनाथ सुक्रे, एकनाथ वाळुंज व इतर ग्रामस्थ सर्वांनी मिळून घरी जाऊन त्याचा सत्कार केला.
No comments:
Post a Comment