संत निरंकारी मंडळ बारामती शाखेस स्वच्छता दूत म्हणून सन्मानित..
बारामती: - बारामती नगरपरिषदेद्वारा माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत आयोजित विविध स्पर्धांच्या विजेत्यांचा गुणगौरव सोहळा व बारामती शहरात पर्यावरण संवर्धनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पर्यावरण दूत शहर स्वच्छतेत विशेष योगदान देणारे संत निरंकारी मंडळ बारामती शाखेस 'स्वच्छतादूत' म्हणून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या ठिकाणी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. पौर्णिमाताई तावरे, उपाध्यक्ष अभिजित जाधव, गटनेते साचीन सातव, आरोग्य सभापती सुरज सातव, मुख्याधिकारी महेश रोखडे, संत निरंकारी मंडळ बारामती शाखेचे मुखी आनंद महाडिक, बाळासाहेब जानकर, तसेच नगर परिषदेचे सन्माननीय पदाधिकारी, नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली.
आपल्या परिसरामध्ये स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनाच्या कामात बहुमूल्य योगदान दिल्याने संत निरंकारी मंडळाच्या बारामती शाखेस स्वच्छता दूत म्हणून गौरविण्यात आले.
सातारा झोनचे झोनल प्रमुख नंदकुमार झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली व बारामती क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक किशोर माने यांच्या मार्गदर्शनाखाली संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून दरवर्षी २३ फेब्रुवारी रोजी तत्कालीन सद्गुरू बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने शहर व परिसरात स्वच्छता अभियान राबविले जाते. यापूर्वी बारामती शहर पोलीस ठाणे, बारामती सिल्व्हर ज्यूबली रुग्णालय, बारामती रेल्वेस्थानक, प्रशासकीय भवन, रुई येथील ग्रामीण रुग्णालय अशा अनेक ठिकाणी चांगल्या प्रकारे स्वच्छता अभियान राबविल्याने संत निरंकारी मंडळ कौतुकास पात्र ठरली आहे.
*गटनेते सचिन सातव यांच्या हस्ते सन्मानपत्र स्विकारताना संत निरंकारी मंडळ बारामती शाखेचे मुखी आनंद महाडिक व सेवादल शिक्षक बाळासाहेब जानकर*
No comments:
Post a Comment