*महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार यांचे खाजगी सचिव मा.हनुमंत पाटील व डॉ सुजित गवळी यांच्या हस्ते पुणे जिल्हा कराटे स्पर्धेचे उदघाटन...*
*जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत १७० कराटेपटूंचा सहभाग*
बारामती:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे व शितो रियो सेको काई कराटे डो असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा सप्ताह निमित्त पुणे जिल्हा कराटे स्पर्धा 2021 चे आयोजन वीरशैव मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते.जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत १७० कराटेपटूंचा सहभाग घेतला होता.
सदर स्पर्धेचे उदघाटन मा. ना. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार यांचे खाजगी सचिव मा.हनुमंत पाटील व डॉ सुजित गवळी यांच्या शुभहस्ते मा. श्री. राजेश बागुल (पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रसंगी मा.मंदार सिकची संचालक बारामती सहकारी बँक, सरपंच मा.धर्याशील राजेनिबाळकर आदी मान्यवर उपस्थिती होते.
बारामती कराटे क्लबच्या वतीने स्पर्धेचे संयोजन करण्यात आले. शिवानी कदम यांनी प्रास्ताविक केले. उपस्थितांचा सत्कार क्लबचे प्रमुख प्रशिक्षक मिननाथ भोकरे सरच्या हस्ते करण्यात आला. युवराज पवार, तेजस कांबळे, विशाल सकट, अनिकेत जवळेकर, मंथन भोकरे, प्राजक्ता धोत्रे, सूरज कांबळे,नवनाथ केडकर,दिव्या केडकर यांनी या स्पर्धेत पंच म्हणून काम केले. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडू, त्याचें पालक, स्पर्धा चे प्रमुख पाहुणे यांचे सौ.शुभांगी भोकरे (महिला कराटे प्रशिक्षका) यांनी आभार मानलें.
No comments:
Post a Comment