*रुग्ण हक्क परिषद सदस्य नोंदणी अभियान उत्साहात सुरू - डॉ. सलीम आळतेकर*
कोल्हापूर:- डॉक्टरांचे संरक्षण आणि रुग्णांच्या न्याय हक्कासाठी लढणारी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आयएसओ मानांकित भारतातील पहिली संघटना म्हणून अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रुग्ण हक्क परिषद महाराष्ट्र प्रदेश या सामाजिक संघटनेने अल्पावधीतच राज्यासह देशात आपली ओळख आणि लोकप्रियता निर्माण केली आहे.
परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रुग्णांचे न्याय हक्क, ''सर्वसामान्य नागरिकांना उपचारांचा हक्क कायद्याने मिळाला पाहिजे'' यासाठीची उभी राहिलेली चळवळ म्हणून रुग्णहक्क परिषदेला मोठा जनाधार लाभला आहे. आजपर्यंत लाखो नागरिकांना शेकडो कोट्यावधी रुपयांचे उपचार मिळवून देऊन संघटनेने करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज कोविड - १९ हॉस्पिटलची निर्मिती करून शेकडो रुग्णांवर सुमारे पाच कोटी रुपयांपर्यंतचे उपचार मोफत केले आणि त्याच सोबत पुण्यातील कोंढवा येथे रुग्ण हक्क परिषदेचे सर्व सोयी सुविधा युक्त अत्यंत दर्जेदार असे आरएचपी हॉस्पिटल निर्माण केले आहे. रुग्णांच्या न्याय्य हक्कासाठी लढत असतानाच एका मोठ्या हॉस्पिटलची निर्मिती करण्याची ऐतिहासिक कामगिरी परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली आहे.
रुग्ण हक्क परिषदेचा वाढता आलेख सोबतच नागरिकांची संघटनेशी जोडून घेण्याविषयीची भावना पूर्ण करण्यासाठीच रुग्ण हक्क परिषदेचे सदस्य नोंदणी अभियान मोठ्या उत्साहात सुरू झाल्याची माहिती रुग्ण हक्क परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सलीम आळतेकर यांनी दिली. यावेळी पुण्यातील पाचशेहुन अधिक नागरिकांनी सदस्यत्व स्वीकारल्याच्या नोंदणी केलेल्या रक्कमेसह धनादेश परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. आळतेकर यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख चंद्रकांत सरवदे, जनरल सेक्रेटरी अपर्णा साठ्ये, महाराष्ट्र प्रदेश संघटक गिरीश घाग उपस्थित होते.
मुंबई-ठाण्यासह, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये सदस्य नोंदणी अभियान जोरदार सुरू केली असल्याची माहिती यावेळी प्रदेश कमिटीतील पदाधिकाऱ्यांनी दिली. उपचार मिळवणे हा आपला हक्क आहे, पैसे नाहीत म्हणून कोणालाही मरू देणार नाही. हा संदेश नोंदणी अभियानांतर्गत रुग्ण हक्क परिषद देत आहे.
अधिक माहितीसाठी-
8806066061
No comments:
Post a Comment