जुगार अडुयावर पोलिसांची कारवाई,11 लाखांच्या मुद्देमालासह 33 जणांना घेतले ताब्यात... वडगाव मावळ:- पुणे जिल्ह्यातील अवैध धंदेवर कारवाई चालू असून वडगाव मावळ येथे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर वडगाव मावळ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या
कारवाईत पोलिसांनी रोख रक्कमेसह 11 लाख
59 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन
33 जणांना ताब्यात घेतले आहे. तर दोन आरोपी फरार झाले आहेत. वडगाव मावळ पोलिसांनी ही कारवाई सोमवारी (दि.24) रात्री ৪ वाजता गिरी पोल्ट्री जवळ, मोरया कॉलनी येथे केली. पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या
माहितीनुसार, वडगाव मावळ हद्दीत गिरी पोल्ट्री
जवळ, मोरया कॉलनी, संतोष रामदास ढोरे यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावर काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून जुगार अड्ड्यावर छापा टाकून 33 जुगार्यांना ताब्यात घेतले. या कारवाईमध्ये 2 चारचाकी वाहने, 3 दुचाकी, 33 मोबाईल, 25 हजार रोख असा एकूण 11 लाख 59 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात 33 जणांना अटक केली असून सागर पांडुरंग वायकर आणि संतोष रामदास ढोरे हे फरार झाले आहेत. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मित्तेश घट्टे , लोणावळा उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास भोसले, पोलीस उपनिरीक्षक संतोष चामे पोलीस कर्मचारी सुनील जावळे, अजित ननावरे,आशिष काळे,अमोल तावरे, मनोज कदम,अमोल ननावरे, श्रीशल्य कंटोळी, शैलेश खोपडे,संजय सुपे, गणपत होले, अजय शिंदे, अनिकेत बोन्हाडे, शिवाजी घुटे यांच्या पथकाने केली.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष चामे करीत आहेत.
No comments:
Post a Comment