उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने 20
लाखाची खंडणी मागणाऱ्या आरोपीला जामीन मंजूर..
पुणे :- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करुन पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अतुल गोयल यांना 20 लाखाची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करुन सहा आरोपींना अटक केली होती. अटक करण्यात आलेला आरोपी सुनिल उर्फ बाळा गौतम वाघमारे याला गुरुवारी (दि.27) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी. एस पाटील यांनी जामीन मंजूर केला आहे.अशी माहिती आरोपीचे वकील अॅड. नितीन भालेराव यांनी दिली.नवनाथ भाऊसाहेब चोरामले (रा. मु.पो.शिरसवाडी, वाढे-वोल्हाई ता. हवेली), सौरभ नारायण काकडे (रा. माळवडी, हडपसर),सुनिल उर्फ बाळा गौतम वाघमारे (रा. मु.पो.तारमाळा रोड, थेऊर), किरण रामभाऊ काकडे (रा. दत्तनगर, थेऊर), चैतन्य राजेंद्र वाघमारे (रा.संस्कृती कॉलनी, फुरसुंगी), आकाश शरद निकाळजे (रा. मु.पो. शिरसवाडी, वाढे-बोल्हाई)अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यापैकी सुनिल उर्फ बाळा गौतम वाघमारे याने अॅड. नितीन भालेराव यांच्या मार्फत जामिनासाठी अर्ज केला होता.आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, नवनाथ चोरामले याच्या आजोबांनी फिर्यादी अतुल जयप्रकाश गोयल यांना जमीन विकली होती.
या जमिनीचा वाद सिव्हिल कोर्टात सुरु आहे.
फिर्यादी यांनी नवनाथ चोरामले याच्या इतर
नातेवाईकांबरोबर सोबत सेटलमेंट केली होती.
परंतु नवनाथ चोरामले यांनी कोर्टात दावा सुरु ठेवला होता.त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपी नवनाथ चोरमले यास सेटलमेंट करण्यासाठी त्यांचे ऑफिस मध्ये बोलवले होते.आरोपी सुनील उर्फ बाळा गौतम वाघमारे हा नवनाथ चोरामले याचा मित्र असल्याने तो त्याठिकाणी गेला होता. यामध्ये त्यांचा काहीही संबंध नाही.आरोपीच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी.एस. पाटील यांनी आरोपीचा 15 हजार रुपये रकमेच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला आहे.तसेच आरोपीला प्रत्येक रविवारी 9 ते 12 या वेळेत बंडगार्डन पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश दिले आहे.आरोपीच्या वतीने अॅड. नितीन भालेराव व अॅड.अजय गुरव यांनी काम पाहिले. या प्रकरणातील सर्व आरोपींना आज जामीन मंजूर झाला असल्याचे प्रसिद्ध झाले.
No comments:
Post a Comment