भारतीय डाक विभाग, पुणे ग्रामीण टपाल विभागामार्फत 24 जानेवारी हा "राष्ट्रीय बालिका दिवस"होणार साजरा..
पुणे:- भारतीय डाक विभाग, पुणे ग्रामीण टपाल विभागामार्फत 24 जानेवारी हा "राष्ट्रीय बालिका दिवस" म्हणून साजरा केला जात आहे. *त्याच अनुषंगाने 22 ते 29 जानेवारी* हा पूर्ण सप्ताह पुणे ग्रामीण विभागातील सर्व पोस्ट ऑफिसमार्फत 10 वर्षाखालील मुलींचे सुकन्या समृद्धी खाते उघडण्यासाठी विशेष अभियान राबविले जात आहे. फक्त रु.250/- भरून तसेच मुलीचा जन्मदाखला, आई किंवा वडिलांचे आधार व पॅन कार्ड झेरॉक्स प्रति व 2 फोटो फॉर्मसोबत देऊन सुकन्या खाते सहज उघडले जाते. पुणे जिल्हा व शहरामधील सर्व नागरिकांनी आपल्या जवळील पोस्ट ऑफिसमध्ये आपल्या 10 वर्षखालील मुलीचे सुकन्या खाते उघडून या योजनेचा लाभ घेऊन "बेटी बचाओ, बेटी पढाओ" साठी सहभाग/पुढाकार घ्यावा असे आवाहन श्री बी पी एरंडे, अधीक्षक डाकघर पुणे ग्रामीण विभाग यांनी केले आहे
No comments:
Post a Comment