लग्नाचे आमिष दाखवून 27 वर्षीय युवतीवर अत्याचार..
पुणे:- आजही महिला सुरक्षित नाही हे घडत असलेल्या घटनेवरून दिसत आहे, तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना पुण्यात समोर आली आहे. हा प्रकार 2016 ते जानेवारी 2022 या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात तरुणावर बलात्कार आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पुण्यात राहणार्या 27 वर्षाच्या तरुणीने अलंकार पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.25) फिर्याद दिली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन मालेगाव येथील 27 वर्षाच्या युवराज शालीकराव सुर्यवंशी रा. मुंगसे, मालेगाव जि. नाशिक याचावर गुन्हा दाखल केला आहे. महिला सहायक पोलीस निरीक्षक संगिता पाटील यांनी दिलेल्या
माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपीची ओळख मोबाईलवर झाली.यानंतर आरोपीने पीड़ितेसोबत मैत्री करुन तीला वारजे ब्रिज येथे भेटण्यास बोलावले.पीडित मुलीला खडकवासला येथे नेऊन तिला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले.तिच्यावर जबरदस्तीने त्यानंतर लग्नास नकार देऊन पीड़ितेची फसवणूक केली. पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक संगिता पाटील करीत आहेत.
No comments:
Post a Comment