पुन्हा एकदा महिला डॉक्टरांचा झाला विनयभंग... पुण्यात 4 महिला डॉक्टरांचा
'सामूहिक' विनयभंग.!
पुणे : नुकताच एका हॉस्पिटल गेट समोर महिला डॉक्टरचा विनयभंग झाल्याची तक्रार दाखल असताना पुन्हा पुण्यातील दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रुग्णाने रुग्णालयातील आलेल्या
एका हेल्पलाईनसाठी मोबाईल पाठवून 4 महिला डॉक्टरांचा क्रमांकावर अश्लिल फोटो मेसेज पाठवून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी पुणे सायबर पोलीस ठाण्यात आंध्रप्रदेशातील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2018 ते 25 जानेवारी 2022 या कालावधीत एका हॉस्पिटलमध्ये घडला आहे. याप्रकरणी तिरुपतीराव गुम्मादी (रा. गंगाधरापुरम कांचिली श्रीकाकुलम, आंध्रप्रदेश) याच्यावर आयटी
अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हॉस्पिटलमधील 29 वर्षीय महिला डॉक्टरने पुणे सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर पोलिसांनी हा गुन्हा कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात केला आहे, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला डॉक्टर या ढोलेपाटील रोडवरील एका हॉस्पिटलमध्ये काम करतात. 2018 मध्ये त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आरोपी उपचार करण्यासाठी दाखल झाला होता. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फॉलोअप कॉल करण्यासाठी मोबाईल ठेवण्यात आले असून यामध्ये व्हॉट्सअप सुरु आहे. हे मोबाईल
फिर्यादी यांच्यासह चार महिला डॉक्टर वापरतात. आरोपीने या मोबाईल क्रमांकावर अश्लिल मेसेज, फोटो पाठवून महिला डॉक्टरांचा विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे दिपाली भुजबळ करीत आहेत.
No comments:
Post a Comment