42 वर्षाच्या महिलेवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार; कोरेगाव पोलिसांनी गांधी व ओसवाल या दोघांना केले अटक..... पुणे(प्रतिनिधी) :- वारंवार येणाऱ्या बातम्या वरून आजही महिला सुरक्षित नसल्याचे दिसत असल्याचे दाखल होत असलेल्या तक्रारीवरून कळते अशीच एक घटना पतीसमवेत रहात नसलेल्या महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन तिला धमकावून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करणार्या दोघांना कोरेगाव पार्क पोलिसांनी केली आहे. भरत जेठामल गांधी (वय ५३, रा. एकबोटे कॉलनी आणि दिलीप पुष्कराज ओसवाल (वय ५३, रा. शुक्रवार पेठ-)अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कोरेगाव पार्क येथे राहणार्या एका ४२ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०१८ पासून सुरु होता. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी व फिर्यादी हे ओळखीचे आहेत.फिर्यादी या त्यांच्या पतीसमवेत रहात नाहीत,याचा गैरफायदा घेऊन आरोपींनी फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध जबरी संभोग केला.धमकी देऊन फि्यादी यांच्याबरोबर जबरदस्तीने अनैसर्गिक संभोग केला.
आरोपींनी धमकाविले असल्याने त्यांनी इतके
दिवस फिर्याद दिली नव्हती. पोलीस उपनिरीक्षक भुजबळ तपास करीत आहेत. पतीसमवेत रहात नसलेल्या महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन तिला धमकावून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करणार्या दोघांना कोरेगाव पार्क पोलिसांनी केली आहे.
No comments:
Post a Comment