बापरे.. 7 कोटींच्या बनावट नोटा जप्त..पोलिसांची मोठी कारवाई! रॅकेटचा पदार्फाश. मुंबई:- 7 कोटी च्या बनावट नोटांवर पोलिसांच्या क्राईम ब्रँचने मोठी कारवाई केली आहे. मुंबई क्राईम बँचने दहिसर भागात बनावट नोटा तयार करणाच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल 7 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.मुंबईमध्ये आज पर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. एवढ्या मोठ्या सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे.प्रमाणात नोटा मुंबईतील दहिसर परिसरात क्राईम ब्ँचने धडक कारवाई करत एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. 7 कोटी रुपयांच्या नोटा मुंबई बाजारात चलनात आणण्याचा डाव या रॅकेटचा होता. पण पोलिसांनी वेळीच त्यांचा हा डाव उधळून लावला आहे. पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. ही एक आंतरराष्ट्रीय टोळी आहे. या आरोपींकडून 7 मोबाईल फोन आणि एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशानदार यांनी सांगितले की,मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 7 कोटी रुपयांच्या 2000 च्या बनावट भारतीय चलनातील नोटा जप्त केल्या आहेत.याप्रकरणात 7 जणांना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने 31 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Post Top Ad
Wednesday, January 26, 2022
Home
ताज्या घडामोडी
मुंबई
बापरे.. 7 कोटींच्या बनावट नोटा जप्त..पोलिसांची मोठी कारवाई! रॅकेटचा पदार्फाश.
बापरे.. 7 कोटींच्या बनावट नोटा जप्त..पोलिसांची मोठी कारवाई! रॅकेटचा पदार्फाश.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment