प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अभिष्टचिंतनाला मान्यवरांची उपस्थिती,आरोग्य सप्ताहाला राज्यभर सुरूवात... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, January 2, 2022

प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अभिष्टचिंतनाला मान्यवरांची उपस्थिती,आरोग्य सप्ताहाला राज्यभर सुरूवात...

प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अभिष्टचिंतनाला मान्यवरांची उपस्थिती,आरोग्य सप्ताहाला राज्यभर सुरूवात...
औरंगाबाद( प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई चे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त औरंगाबाद विभागिय कार्यालयात अभिष्टचिंतन करण्यात आले.यावेळी माजी मंत्री, आमदार अतुल सावे, शिवसेना नगरसेवक राजू वैद्य, संपादक दयानंद माने, धनंजय लांबे, जगदीश बियाणी, बाबा गाडे, अनिल सावंत,प्रा. डॉ.प्रभू गोरे यांच्या सह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भागवत कराड, कपिल पाटील,सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, यांच्या सह अनेक मान्यवरांनी भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.पत्रकार संघाच्या वतीने राज्यभर रक्तदान, अवयव दान, संपूर्ण तपासणी सामाजिक उपक्रमांनी आरोग्य सप्ताहाला सुरूवात झाली.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे आणि सरचिटणीस विश्वास आरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य संघटक संजय भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आरोग्य मीत्र व युथ सोशल वेल्फेअर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाही राज्यभर १ ते ७ जानेवारी २०२२ दरम्यान आरोग्य सप्ताहा राबविण्यात येत आहे.शनिवार दि १जानेवारी रोजी औरंगाबाद विभागिय कार्यालयात वसंत मुंडे यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.यावेळी माजी मंत्री, आमदार अतुल सावे, शिवसेना नगरसेवक राजू वैद्य,
लोकमतचे संपादक धनंजय लांबे, दयानंद माने,बाबा गाडे, जगदीश बियाणी,अनिल सावंत, प्रा.सुरेश पुरी,छबुराव टाके, प्रल्हाद दगडखैर,कवी श्रावण गिरी यांच्या सह अनेक पत्रकार, विविध पक्षांचे पदाधिकारी यांनी भेटून शुभेच्छा दिल्या.औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. प्रभू गोरे यांच्या नियोजनाखाली राज्यभरात संघाच्या पदाधिकाऱ्यांनी रक्तदान शिबिर, अवयव दान शिबिर, संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिर,फळे वाटत, असे उपक्रम घेत आरोग्य सप्ताहाला सुरूवात केली. मागच्या वर्षी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अहवाहना नुसार रक्तदान शिबिर घेऊन चौदाशे पिशवी रक्त संकलन करून दिले होते.यावेळीही पत्रकारांसाठी संघाच्या वतीने राज्यभर कार्यक्रम  घेण्यात येत आहेत.

No comments:

Post a Comment