पुणे जिल्हा परिषद मा. जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक दादा वळसे पाटील यांच्या माध्यमातून डांबरीकरना साठी पंधरा लाखमंजूर.
लोणी धामणी (वार्ताहर -कैलास
गायकवाड):- महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा.ना.दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व पुणे जिल्हा परिषद मा. उपाध्यक्ष विवेक दादा वळसे पाटील यांच्या माध्यमातून पुणे जिल्हा परिषदेच्या निधी मधुन लोणी पाबल रोड ते खंडागळे वस्ती रस्ता डांबरीकरण करणे साठी १५ लाख रूपये मंजूर करण्यात आला होता. या रस्त्यावर खूप खड्डे पडले होते. वर्दळीसाठी रस्ता खराब झाला होता. या भागातील नागरिकांनी रस्ता दुरूस्ती करून डांबरीकरण करण्यात यावा अशी मागणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा.विवेक दादा वळसे पाटील यांच्याकडे केली होती. या कामासाठी दादांनी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या कामाचा शुभारंभ सोमवार दिनांक १०|१|२०२२ रोजी सकाळी ठिक १० वाजता उपस्थित ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी शरद बँकेचे संचालक अशोक आदक पाटील, माजी. सरपंच उद्धवराव लंके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गण प्रमुख बाळशिराम वाळुंज, विद्यमान उपसरपंच अनिल पंचरास, माजी चेअरमण अशोक वाळुंज, सतीश थोरात, माजी उपसरपंच सुरेखा थोरात, राणी ताई गायकवाड, दिलीप आदक, माजी सरपंच नितीन आढाव, महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष संतोष पडवळ, हैबत राव आढाव, गंगाराम खंडागळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment