काय सांगता.. बारामती तालुक्यातील उडवंडी कार्यकक्षेत येणाऱ्या गावात अवैध मुरूमाची होतेय वाहतूक जास्त,मात्र महसूल व आरटीओ विभागाचे दुर्लक्ष..! उंडवडी :- बारामती तालुक्यातील एक असा गाव आहे या गावाच्या अंतर्गत १४ गावांचे क्षेत्र येत असून या गावातील मंडल अधिकारी नक्की करतात तरी काय त्यांना दिलेल्या जबाबदारी ते पार पाडतात की नाही हीच चर्चा होताना दिसत असून असाच काहीसा प्रकार उंडवडी येथील मंडल अधिकारी पुन्हा गायब झाले आहेतअश्या बातम्या देखील आल्या होत्या.महिन्यांपासून उंडवडी कडेपठारच्या मंडल अधिकारी कार्यालयाकडे ते फिरकलेच नाहीत. परिणामी शेतकरी आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.१५ गावांतील शेतकरी आणि विद्यार्थ्यांना आपल्या विविध कामांच्या एका सहीसाठी मंडल अधिकार्यांना शोधण्यासाठी दिवसभर भटकंती करुन आर्थिक भुरदंडाला सामोरे जावे लागत आहे. सलग दोन वर्ष हा प्रकार सुरू आहे. परिणामी अधिकार्यांच्या सहीसाठी ग्रामस्थांना
मागील दोन महिने त्यांच्या मागे चकरा माराव्या लागत आहेत.उंडवडी कडेपठार येथे मंडल मुख्य कार्यालय आहे. यामध्ये इतर १४ गावांचे कार्यक्षेत्र आहे. मागील अनेक दिवसापासून मंडल अधिकारी गैरहजर असल्यामुळे कार्यालय धूळ खात पडले आहे. अनेकदा संपर्क करून देखील कसलाही प्रतिसाद मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहे. सध्या पालखी महामार्ग आणि अहमदनगर महामार्गा यामध्ये शेतकर्यांच्या जमिनीचे भूसंपादन झाल्याने या पंचनाम्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी मंगळवार (दि. ११ ) रोजी आले असता पंचनाम्याच्या दरम्यान मंडल अधिकारी गैरहजर असल्याने शेतकर्यांना खूप अडचणी निर्माण झाल्या होत्या.उंडवडी कडेपठार गावासाठी कार्यालय आठवड्यातून सोमवार व गुरुवार असे दोन दिवस मंडल अधिकारी यांना कार्यालयात कामासाठी उपस्थित राहणे बंधनकारक आहे. मात्र तरी देखील आजपर्यंत उपस्थित राहिले नाहीत असे सांगण्यात आले. मंडल अधिकाऱ्यांच्या सहीसाठी अजून किती
दिवस वनवन फिरायचे असा प्रश्न शेतकरी आणि विद्यार्थी यांनी उपस्थित केला आहे.बेजबाबदार मंडल अधिकार्यावर कारवाई करावी, आणि लवकरात अश्या लवकर नवीन अधिकार्याची नेमणूक करून शेतकरी आणि विद्यार्थी यांची एका सहीसाठी होणारी भटकंती थांबण्याची मागणी केली आहे.काही दिवस मंडल अधिकारी येथे आले.मात्र त्यानंतर पुन्हा मंडल अधिकारी गायब झाले आहेत. त्यामुळे या अधिकार्यांवर वरिष्ठांचा वचक आहे की नाही, असा देखील सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. तर त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रातील काही गावात उदाहरण-उडवंडी,गोजुबावी,बऱ्हाणपूर, सावंतवाडी असे अनेक ठिकाणी अवैध मुरूम उत्खनन चालू असून त्याची बिगर रॉयल्टी वाहतूक होत आहे याबाबत तक्रार करूनही दखल घेतली जात नाही नव्हे आर्थिक तडजोड करीत असल्याने कारवाई होत नाही असेही स्थानिक रहिवाशी बोलताना दिसत आहे,याकडे महसूल विभाग कधी लक्ष देईल हे येणार काळच ठरवेल तोपर्यंत ही अवैध वाहतूक चालूच राहील हे सध्या तरी दिसत आहे.तर आरटीओ विभाग यांना ओव्हर लोड होणारी वाहतूक दिसत नाही का,यावर कारवाई का होत नाही असा सवाल होत आहे, तसेच या क्षेत्रातील तलाठी मात्र कोणत्या तरी कामात व्यस्त असल्याचे सांगून कारवाईची वेळ टाळत असून याकडे तहसीलदार व प्रांतअधिकारी लक्ष देतील का की काना डोळा करतील हे पाहावे लागेल..पुढील अंकी.
No comments:
Post a Comment