माजी संचालक यांच्यासह ५ जणांवर बेकायदा सावकार प्रकरणी गुन्हा दाखल, एकाला अटक.. पुणे : बेकायदा सावकारी प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी हवेली बाजार समितीचे माजी संचालक राजाराम आबुराव कांचन यांच्यासह पाच जणांवर बेकायदा सावकारी प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यातील एकाला अटक
करण्यात आली आहे.याप्रकरणी विकास रामदास कटके (वय ३०, धंदा शेती, रा. आष्टापुर माळवाडी, ता. हवेली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी स्वप्नील राजाराम कांचन, राजाराम आबुराव कांचन रा. ऊरुळी कांचन, ता. हवेली, प्रशांत गोते, रा. बिवरी, ता. हवेली यांच्यासह आणखी दोन ते तीन जणांच्या विरुद्ध लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ
पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी
दिलेल्या माहितीनुसार, २०१६ ते आजपर्यंत
स्वप्नील कांचन यांचेकडुन व्याजाने घेतलेल्या
सात लाख रुपयांचे व्याज म्हणुन विकास
कटके यांच्याकडून ४ लाख ६० हजार रुपये
घेऊन स्वप्निल कांचन यांनी प्रशांत गोते व त्यांचे
सोबतचे दोन अनोळखी साथीदार यांचे साथीने
बळजबरीने स्वप्नील कांचन त्यांचे गाडीत टाकुन लोणीकाळभोर हवेली क्र. ६, सब रजिस्ट्रार ऑफिस मध्ये घेऊन जाऊन विकास
कटके व त्यांचे कुटुंबियांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानुसार, शिंदवणे (ता. हवेली) येथील बेकायदेशीर व्याजापोटी १८ गुंठे जमीन प्रशांत गोते याच्या नावावर करून घेऊन विकास
कटके याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले.
त्यानंतरही अजुनही व्याजाचे पैसे शिल्लक आहे असे सांगुन कटके यांची ऊर्वरीत
वडीलोपार्जीत जमीन त्याचेकडील कर्जाचे
बेकायदेशीर व्याजापोटी त्यांचे नावे करुन देण्याकरीता कुटुंबियांना जिवे ठार मारण्याची धमकी देऊन जाच करत असे व व्याज वसुलीसाठी सतत तगादा लावुन त्रास देत होता.सदर गोष्टीचे गांभीर्य ओळखून लोणी काळभोर पोलिसांनी राहते घर व ऑफिसची झडती घेण्याकरिता तीन पथके तयार करून वरील आरोपींच्या कार्यालय व घराची झडती घेतली.त्यानुसार आरोपी स्वप्नील राजाराम कांचन याच्या राहत्या घरातून रोख रक्कम ५७ लाख ३८ हजार ५४० व ४८ लाख ६२ हजार ५००
रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण १ कोटी ६ लाखांची बेहिशोबी मालमत्ता तसेच इतर महत्वाचे दस्तऐवज जप्त केले असुन यातील
आरोपी स्वप्निल कांचन यास अटक केली आहे. दरम्यान, रविवारी (ता. ३०) स्वप्नील कांचन यास न्यायालयात हजर केले असता त्यास दोन
दिवसांची रिमांड पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सदरच्या आरोपींकडुन अजुन कोणाला फसविले गेले असेल तर लोकांनी तक्रार
देण्यासाठी पुढे यावे असे आव्हान वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी नागरिकांना केले आहे.सदरची कारवाई सहायक पोलीस आयुक्त
हडपसर विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी व पोलीस ठाण्यातील इतर अधिकारी व अंमलदार यांनी केला असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे हे करीत आहेत.
No comments:
Post a Comment