महिलांनी आर्थिक सक्षमीकरण साठी पुढाकार घ्यावा: डॉ सुहासिनी सातव - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, January 17, 2022

महिलांनी आर्थिक सक्षमीकरण साठी पुढाकार घ्यावा: डॉ सुहासिनी सातव

महिलांनी आर्थिक सक्षमीकरण साठी पुढाकार घ्यावा:  डॉ सुहासिनी सातव 

बारामती  :- शिक्षण पूर्ण झाल्यावर इतरांवर अवलंबून न राहता स्वतः आर्थिक स्वालबन झाल्यावर माहेर व सासर  या दोन्ही कडे महिलांनी इतर महिलांचे  आर्थिक सक्षमीकरण साठी पुढाकार घ्यावा असे मत बारामती नगरपरिषद च्या महिला व बालकल्याण समिती च्या माजी सभापती व  नगरसेविका डॉ सुहासिनी सातव यांनी केले.मेसाई व्यवसाय प्रशिक्षण संस्था व श्रद्धा ब्युटी पार्लर यांच्या वतीने बेसिक ब्युटीशीयण हा  व्यसाईक अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल व प्राविण्य प्राप्त प्रशिक्षनार्थी यांचा गुणगौरव कार्यक्रम सोमवार दि 17 जानेवारी रोजी संपन्न झाला या वेळी डॉ सातव बोलत होत्या.या प्रसंगी बारामती नगरपरिषद च्या  पाणीपुरवठा सभापती अनिता जगताप,आरोग्य सभापती सूरज सातव,राष्ट्रवादी शहर महिला काँग्रेस च्या अध्यक्षा अनिता गायकवाड, सचिव रीहना शेख,रेश्मा ठोंबरे,वैष्णवी गायकवाड, सायली भोसले, सुनील पवार, तन्या पवार आदी मान्यवर उपस्तीत होते.महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा असेही डॉ सुहासिनी सातव यांनी सांगितले.बालका पासून ते ज्येष्ठा पर्यंत प्रत्येकास सुंदर दिसावे वाटते त्यामुळे सौन्दर्य क्षेत्रात मुली महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार संधी व स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास वाव असल्याची माहिती तन्या पवार यांनी दिली 
उपसितांचे स्वागत सुनील पवार यांनी केले तर आभार मेसाई संस्थेच्या वतीने मानण्यात आले.
प्रथम क्रमांक शबनम शेख दुसरा क्रमांक सुमन भोसले व तृतीय क्रमांक विभागून  निकिता खांडेकर व प्रेरणा होळकर याना देण्यात आला तर सारिका डोईफोडे,हर्षदा घाडगे,दीपा चव्हाण,वर्षा देवकुळे,अनुराधा साळुंके,मयुरी चव्हाण ,निकिता ढोबळे आदी ना सहभागा बदल गौरविण्यात आले. 


No comments:

Post a Comment