जलजीवन मिशन अंतर्गत प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनांना मंजुरी... बारामती:- बारामती तालुक्यातील जलजीवन मिशन अंतर्गत प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनांना राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार व खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या विशेष प्रयत्नांतुन पाणी
पुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालय मुंबई यांचेकडुन रूपये ३४५ कोटी रक्कमेच्या योजनांना प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे. बारामती तालुका टँकर मुक्तीच्या दृष्टीने राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. अजितदादा पवार यांचे संकल्पनेतुन या योजनांची आखणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेमार्पत (MJP) करण्यात आलेली होती. त्यास राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री मा.ना श्री. गुलाबराव पाटील व राज्यमंत्री मा.ना.श्री.संजय बनसोडे यांचे विशेष सहकार्य लाभले.यामध्ये ५५ गावे व ४२१ वाडया / वस्त्यांचा हा आराखडा बनविण्यात आला होता. या योजनेसाठी पाटबंधारे विभाग व महसुल विभागाकडील सुमारे ५५ एकर जागा साठवण तलाव, जलशुध्दीकरण केंद्र व उंच
जलकुंभ यासाठी जागा संपादित करण्यात आली आहे. तसेच निरा -डावा कालवा व खडकवासला कालवा मधील पिण्याच्या पाण्याचे आरक्षणासाठी पाटबंधारे खात्याने रितसर परवाना दिला आहे. त्याच बरोबर या सर्व योजनांसाठी साठवण तलाव, मुख्य संतुलन पाणी टाकी, जलशुध्दीकरण केंद्र, वितरण व्यवस्था,पंपहाऊस इ. बाबी बरोबर सदरचे योजनेसाठी सौर उर्जाद्वारे विज उपलब्ध होणार आहे . त्यामुळे योजना विज देयकावरील ग्रामपंचायतीचा खर्च कमी प्रमाणात येणार आहे.तसेच या अगोदर मुट्टी प्रादेशिक व इतर ७ गावे या प्रादेशिक योजनेसाठी २२ कोटी ७५ लक्ष रूपये इतक्या निरधीचे काम प्रगती पथावर असुन दुसऱ्या टप्प्यासाठी १२ प्रादेशिक योजनांसाठी सुमारे २३० कोटींच्या प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना प्रस्तावित केल्या असुन जागेसह अनेक परवानग्या मंजुर करून घेण्यात आलेल्या आहेत.उंच जलकुंभ,१) सुपे प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना २) देऊळगांव रसाळ प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना ३) कटफळ - जैनकवाडी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना - ६४.३८ कोटी ४) गोजुबावी - खराडेवाडी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना ५१.१५ कोटी ५) लोणी -६) थोपटेवाडी - लाटे प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना ७) होळ - सस्तेवाडी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना अशी माहिती टँकरमुक्त समितीचे समन्वयक व बारामती तालुका पुनर्विलोकन व एकात्मिक विकास
समन्वय समितीचे अध्यक्ष श्री.संभाजी होळकर व बारामती तालुका पंचायत समितीच्या सभापती सौ.निताताई फरांदे यांनी दिली.५७.९८ कोटी
६५.०८ कोटी - |भापकर प्रादेशिक नळपाणीद पुरवठा योजना - ५७.५८ कोटी २०.७० कोटी २८.२६ कोटी
No comments:
Post a Comment