दहा वर्षाखालील मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना व नवीन आधार कार्ड काढण्यासाठी मेळावा... शिंगवे;- दिनांक ०३.०१.२०२२ रोजी बालिका दिनानिमित पारगाव तर्फ अवसारी शाखा डाक घरअंतर्गत शिंगवे येथे भारतीय डाक विभाग व ग्रामपंचायत शिंगवे यांच्या संयुक्त विद्यमाने
दहा वर्षाखालील मुलींसाठी सुकन्या समृदधी योजना व नवीन आधार कार्ड काढण्यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला. सदर मेळाव्या चा गावकन्यांनी जास्तीत जास्त
उपयोग घेतला. सदर मेळाव्या मध्ये सौ.सीता राम पवार सरपंच , संतोष ओव्हाळ उपसरपंच तसेच ग्रामसेवक शिंगवे ग्रामपंचायत यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने शिंगवे गावातील मुलींसाठी सुकन्या समृद्धी खाते उघडण्यासाठी प्रत्येक खात्याला रु.१००० याप्रमाणे ३६ सुकन्या समृद्धी खाते उघडण्यासाठी रु.3६०००/ चा धनादेश दिला त्याप्रमाने सदर खाते उघडण्यात आली. तसेच या मेळाव्या मध्ये ३२ नवीन आधार काई काढण्यात आली व सदर मेळावा अजून सुद्धा चालू आहे. सदर मेळाव्याचे आयोजन हे पुणे ग्रामीण विभागाचे डाक अधीक्षक श्री. बाळकृष्ण.पो.एरंडे यांच्या मार्गदर्शनाखाली, सौ. सीताराम पवार सरपंच , श्री.संतोष ओव्हाळ उपसरपंच, ग्रामसेवक व सर्व य्रामस्थ शिंगवे ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने करण्यात आले. सदर मेळाव्यासाठी श्री. प्रमोद भोगाड़े उपविभागीय डाक निरीक्षक खेड उपविभाग, श्री. शिवाजीराव हजारे डाक सेवक पाबळ व श्री. मंडलिक शाखा डाकपाल पारगाव तर्फे अवसारी शाखा डाक घर येथील कर्मचार्यानी उत्तम नियोजन केले होते.तळेगाव दाभाडे येथे माजी मंत्री श्री. संजय (बाळा भाऊ ) भेगडे, यांच्या वाढदिवसानिमित श्री. रवींद्र बाळासाहेब माने भाजपा शहर अध्यक्ष तळेगाव दाभाडे यांनी
२०० सुकन्या समृद्धी खाते उघडण्यासाठी पुढाकार घेतला व सर्व शाळेमध्ये जाऊन खाते खाते उघडण्यात आली.उघडण्यासाठी अर्ज जमा करुन ताबडतोब २०० पासबुक वितरीत करण्यात आले.दि ०३.०१.२०२२ रोजी माजी मंत्री श्री. संजय (बाळा भाऊ) भेगडे, यांच्या वाढदिवसानिमित कार्यक्रम घेऊन सर्व मुलीना सुकन्या समृद्धी खात्याचे पासबुक वितरीत करण्यात आले.तळेगाव दाभाडे येथील कार्यक्रमासाठी सहाय्यक अधीक्षक, उप डाकपाल, डाक सेवक व तळेगाव येथील सर्व कर्मचार्यानी नियोजन केले. श्री. बाळकृष्ण.पो.एरंडे, डाक अधीक्षक पुणे ग्रामीण विभागातर्फे सर्व नागरिकांना तसेच ग्राम पंचायतीना आवाहन करण्यात येते कि, ज्यांना आपल्या गावातील १० वर्षाखालील मुलींचे सुकन्या समृद्धी खाते काढायचे आहे त्यांनी नजीकच्या पोस्ट ऑफिस किंवा डाक अधीक्षक पूणे ग्रामीण विभाग पुणे-५ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.
No comments:
Post a Comment